“हे ” Healthy drinks तुम्हाला ऊन्हापासून वाचवू शकतात …..

“हे ” Healthy drinks तुम्हाला ऊन्हापासून वाचवू शकतात …..
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : ऊन्हाळ्याच्या झळा मार्चपासूनच जाणवायला सुरूवात झाली आहे. उष्णतेमुळे शरीर फक्त डिहायड्रेट होत नाही तर अनेक वेगवेगळे आजार सुद्धा होतात. पण बऱ्याच लोकांना अश्या वेळी नक्की काय करावे , कोणते थंड आणि पौष्टिक रस घ्यावा हे समजत नाही. "हे " healthy drinks चांगल्या चवीसोबतच हायड्रेटेडसुध्दा ठेवतात.

 नारळ पाणी : उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायला पाहिजे. हे शरीरासाठी अतिशय लाभकारी असून नारळ पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. यासोबतच यामध्ये असणारे पोटैशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करायला सुध्दा मदत करते.

लिंबू पाणी : लिंबू पाणी जवळपास सगळ्याच लोकांना आवडतेे. उन्हाळ्यात लिंबू पाणी सगळ्यात जास्त पिले जाते कारण याची बनवण्याची पध्दत सुध्दा खुप सोपी आहे. या रसात विटामिन सी भरपूर प्रमाणात असते. याव्यतिरिक्त, कैंसर,लठ्ठपणा,डायबिटिज यांसारख्या आजाराशी लढण्यास सुध्दा मदत करते.

ताक : ताक हे विशेषतः उन्हाळ्यात पिले जाणारे अप्रतिम पेय आहे. हे सगळ्यात पाैष्टिक पेयांपैकी एक आहे. यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते,जो हाडांना मजबूत ठेवण्यात मदत करतो. याशिवाय, याला पिल्यावर शरीराचे पाचनतंत्र सुध्दा सुधारते.

कोकम : उन्हाळ्यात आवर्जून पिणाऱ्या पैयांपैकी कोकम हे एक पैय आहे.कोकममध्ये व्हिटॅमिन-सी हे जीवनसत्वे भरपुर प्रमाणात असते पण त्याबरोबरच hydrocitric acid नावाचे अत्यंत महत्वाचा आरोग्यदायक घटक असतो.शरीराचे तापमान थंड ठेवण्यास कोकम मदत करतो.

कोकम सरबत (Kokum juice)
कोकम सरबत (Kokum juice)

 पन्हे : उन्हाळा हा आंबा आणि कैरीचा सीजन असतो. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात . तसेच शरीराची उष्णता कमी करण्यास मदत करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news