Asthma| मुलांमधील अस्थमाची लक्षणे

बालदमा असलेल्या मुलांमध्ये श्वसनमार्ग आणि फुफ्फुसे ही अतिसंवेदनशील असतात.
Asthma
मुलांमधील अस्थमाची लक्षणेFile Photo
Published on
Updated on

बालदमा असलेल्या मुलांमध्ये श्वसनमार्ग आणि फुफ्फुसे ही अतिसंवेदनशील असतात. त्यामुळे हवेतील धूलिकण किंवा सर्दी झाली, तर त्याचा लगेचच त्रास होतो. काही मुलांमध्ये ही लक्षणे तीव्र असतात. त्यांना अस्थमाचा अॅटॅक येऊ शकतो.

Asthma
Gold Rate Today | सोने- चांदी महागली, जाणून घ्या नवे दर

अस्थमा हा मुलांमधील ए एक गंभीर आजार मानला जातो. लहानपणी अनेक मुलांना बाळदमा असतो. त्याशिवाय अनेक गोष्टींचा परिस्थितीचा परिणाम म्हणून अस्थमाचा त्रास वाढू शकतो. जसे इसब, परागज्वर किंवा हे फीव्हर तसेच काही आहाराचे संसर्ग. मुलांमधील अस्थमाची अगदी काही साधी लक्षणे आहेत.

जसे खोकला, छातीत घरघर होणे. खोकला हा अस्थमाचाच असेल असेही नाही काही वेळा ते फक्त लक्षण असते. जेव्हा खोकला हे निव्वळ लक्षण असेल, तर त्याला कोरड्या खोकल्याचा अस्थमा असे म्हणतात. त्यात फक्त कोरडा खोकला येतो; मात्र कफ पडत नाही. व्हिजिंग किंवा छातीत आवाज होतो तो श्वसनमार्ग कफामुळे संकुचित झाल्याने श्वसनाचा आवाज असतो.

Asthma
गरज नियंत्रणाची आणि नियोजनाची

मुलांच्या अस्थमाची इतरही काही लक्षणे दिसतात

■ सतत व्हिजिंग, खोकला किंवा श्वसनात अडथळा, झोप लागण्यास त्रास होतो.

■ खोकला किंवा सर्दी खूप जास्त असल्यास सर्दी किंवा फ्लू होतो.

■ श्वसनसंस्थेला संसर्ग झाल्यास ब्रॉन्कायटिस होतो किंवा संपूर्ण बरे होण्यास कालावधी जातो.

■ श्वसनाला त्रास होत असल्याने खेळणे किंवा व्यायाम करण्यावर बंधने येतात.

■ शांत झोप नसल्याने किंवा अपुऱ्या झोपेमुळे थकवा येतो. Π मुलांच्या अस्थमाचे निदान हे वैद्यकीय तपासणीनंतरच होते. पण, सर्वसाधारणपणे काही मुलांना आनुवंशिक अस्थम्याचा त्रास होतो तेव्हा त्यांना खेळताना त्रास होतो, सतत सर्दी असते, श्वसनमार्गात संसर्ग होतो.

अस्थमा आहे की नाही हे कळण्यासाठी सुरुवातीला जी औषधे दिली जातात त्याचा योग्य परिणाम झाल्यास अस्थमा असल्याचे निदान योग्य असल्याचे समजते. वरील कोणतीही लक्षणे सतत दिसत असल्यास, आपल्या मुलाला वैद्यकीय सल्ला आणि तपासणीसाठी डॉक्टरांकडे न्यावे. यावर जितक्या लवकर उपचार केले जातील, तितकीच नियमित दिसणारी लक्षणे आटोक्यात ठेवता येतील. त्याशिवाय अस्थमाचा येणारा अॅटॅकही रोखता येईल. अस्थमाच्या कारकांना अटकाव करणे, योग्य आणि वेळच्या वेळी औषधे घेणे, लक्षणांवर नजर ठेवणे, यामुळे मुलांमधील अस्थमाला थोडा अटकाव करता येतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news