

साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनातून एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार, जर गर्भधारणा झाल्यापासून ते मुलाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षे साखरेचे सेवन कमी ठेवले, तर त्या मुलाला मोठेपणी हृदयविकार होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. तज्ज्ञांचे मत आहे की, बालपणीच्या काळात साखरेवर नियंत्रण ठेवल्यास हृदय अधिक मजबूत बनते.
आपले हृदय आपल्या शरीरातील 'इंजिन' असते. ते व्यवस्थित काम केले तर आपले संपूर्ण शरीर निरोगी राहते. मात्र, हृदयाला काही त्रास झाल्यास अनेक समस्या सुरू होतात.
संशोधकांनी केलेल्या तपासणीनुसार, ज्या मुलांच्या आहारात बालपणीच्या टप्प्यात विशेषतः पहिल्या दोन वर्षांत जास्त प्रमाणात साखर होती, त्यांना मोठे झाल्यावर हृदयविकाराचा धोका जास्त आढळला.
या काळात शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण अवयवांचा विकास होत असतो. याच वेळी जर जास्त साखर मिळाली, तर शरीराची यंत्रणा बिघडते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीची वर्षे ही हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या विकासासाठी खूप महत्त्वाची असतात.
या महत्त्वाच्या टप्प्यात जास्त साखर खाल्ल्यास, शरीराला भविष्यातील आरोग्यच्या समस्या (उदा. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल) ' उद्भवण्याची शक्याता अधिक आहे.
याउलट, जर तुम्ही साखर नियंत्रित केली, तर हृदयाच्या पेशी अधिक निरोगी राहतात आणि शरीरातील रक्तवाहिन्या योग्य प्रकारे विकसित होतात, ज्यामुळे वृद्धापकाळातही हृदय निरोगी राहते.
या काळात मुलांना साखर आणि साखरयुक्त पेय, पॅकेज्ड फूड किंवा ज्यूस देणे टाळणे हे त्यांच्या भविष्यातील आरोग्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे.
हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचा धोका कमी होतो.
लठ्ठपणा आणि दात किडणे यांसारख्या समस्या टाळता येतात.
मुलांचे एकूण आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
पालकांनी आपल्या मुलांना पहिल्या दोन वर्षांत साखर आणि मीठ यांसारख्या गोष्टींपासून दूर ठेवून नैसर्गिक आणि पौष्टिक आहार देण्यावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.