

Sleep Shaming: भारतात उशिरापर्यंत झोपणाऱ्या लोकांना आळशी म्हणून हिणवलं जातं. त्यांना लवकर उठण्यासाठी दबाव टाकला जातो. रात्री काय भजन करत होतास काय असे टोमणे मारले जातात. कुटुंबातील अनेक व्यक्ती या कथित आळशी व्यक्तीला उठवण्यासाठी पंखा बंद करणे, लाईट लावणे, ब्लँकेट काढून टाकणे, मोठा आवाज करणे अशा करामती करत असतात.
जर तुम्ही त्या कथित आळशी व्यक्ती असाल आणि तुम्ही देखील अशा करावायांनी हैराण झाला असाल तर हे आर्टिकल तुमच्या कुटुंबाला दाखवा. अर्थोपेडिक सर्जन डॉक्र मनन वोरा यांच्या म्हणण्यानुसार एखाद्याबद्दल स्लीम शेमिंग करणं किंवा त्याचा जास्त वेळ झोपण्यावपून त्याला घालून पाडून बोलणं ही चुकीची गोष्ट आहे.
डॉक्टर मनन वोरा यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय घरांमध्ये मुलांना शिस्त लावण्याच्या नावाखाली लोकांना सकाळी लवकर उठवण्याचे प्रयत्न केले जातात. यासाठी तुम्ही जर त्याला टोमणे मारणे, त्याची झोपमोड व्हावी म्हणून फालतू गोष्टी करणे असं कारनामे करत असाल तर त्याला स्लीप शेमिंग म्हणतात. सकाळी लवकर उठणे ही चांगलीच गोष्ट आहे. ती आरोग्यासाठी हीतकारक आहे. मात्र जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत काम करत असाल आणि तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर ही गोष्ट देखील योग्यच आहे. तो आळशीपणा होत नाही.
झोपणे म्हणजे फक्त झोपेचा कालावधी पूर्ण करण्याची प्रक्रिया नाही. यादरम्यान मेंदू आणि शरीर स्वतःला रिपेअर करत असते. एखाद्या व्यक्तीला जवळपास ६ ते ८ तास झोप गरजेची असते. जर कोणी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असेल. किंवा तणावामुलं जागा रहात असेल तर सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत उठणं हा काही आळशीपणा नाही. ती त्याच्या शरीराची गरज असू शकते. झोप पूर्ण झाली नसताना उठण्यामुळे दिवसभर शरीर थकल्यासारखे होते.
डॉक्टरांच्या मते आरम हराम आहे ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. झोप पूर्ण होऊ द्या अशी मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक शरीराची एक गरज असते. झोप देखील या गरजेचाच एक भाग आहे. कोणाची झोप ही ६ तासात पूर्ण होऊ शकते तर काहींना १० तास झोप लागू शकते. झोप पूर्ण होण्याचे फायदे जाणून घेऊयात...
मेंदू रीसेट होतो
मूड चांगला होतो
इम्युनिटी सिस्टम चांगली राहते
झोप पूर्ण झाल्यावर शरीर अॅक्टिव्ह होतं
निर्णय घेण्याची क्षमता सुधारते
शरीर नैसिर्गिकरित्या रिकव्हर होते.