

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे लोकांना माहीत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कर्करोग तिसर्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचल्यावर रुग्ण उपचारासाठी येतात. अशा अवस्थेत रुग्णांवर उपचार करणे हे एक मोठे आव्हान असते, कारण सुरुवातीच्या टप्प्यातील रोगाचे परिणाम प्रगत अवस्थेपेक्षा चांगले असतात. त्यामुळे पोटाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. असे अनेक रुग्ण आहेत, जे याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचा सामना करतात.
बर्याचदा उतारवयात अनेक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. जसे की, भूक मंदावणे, पोटात दुखणे, जास्त खाल्ल्याने पोट फुगणे इत्यादी; परंतु 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी सीडीटी आणि पोटासंबंधित अस्वस्थता यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये; कारण ही लक्षणे पोटाच्या कर्करोगाची असू शकतात. वजन कमी होणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे याव्यतिरिक्त आंबट ढेकर येणे आणि ओटीपोटात दुखणे यासाठी त्वरित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. या कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करता येऊ शकते आणि जीवनमान वाढू शकते. उपचार पर्यायांमध्ये सामान्यत: केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसह शस्त्रक्रियेचा समावेश असतो.
पोटाच्या कर्करोगाची लक्षणे लोकांना माहीत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कर्करोग तिसर्या किंवा चौथ्या टप्प्यात पोहोचल्यावर रुग्ण उपचारासाठी येतात. अशा अवस्थेत रुग्णांवर उपचार करणे हे एक मोठे आव्हान असते, कारण सुरुवातीच्या टप्प्यातील रोगाचे परिणाम प्रगत अवस्थेपेक्षा चांगले असतात. त्यामुळे पोटाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. असे अनेक रुग्ण आहेत, जे याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचा सामना करतात. जठराचा कर्करोग, सामान्यतः पोटाचा कर्करोग म्हणून ओळखला जातो. जेव्हा पोटातील असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात तेव्हा हा कर्करोग उद्भवतो. तणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, रोगाचा कौटुंबिक इतिहास, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा आणि जीवनशैलीतील बदल यासारखे घटक त्याच्या विकासात भूमिका बजावू शकतात. वयानुसार पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लक्षणांमध्ये भूक कमी होणे, मळमळ आणि उलट्या होणे, छातीत जळजळ, अपचन आणि वजन कमी होणे यांचा समावेश होतो. बहुतेक वेळा हिमोग्लोबिन कमी होते, ज्यामुळे खूप अशक्तपणा येतो ही एक वाढत्या वयामुळे उद्ऊवणारी समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
ज्येष्ठ नागरिकांनी आंबट ढेकर, अशक्तपणा आणि ओटीपोटातील वेदना व अस्वस्थता यांसारखी लक्षणे गांभीर्याने घ्यावीत, कारण ते पोटाच्या कर्करोगाचे संकेत ठरतात. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष करू नये. 40 वर्षांच्या तरुणांमध्ये पोटाच्या कर्करोगासारख्या समस्येची 30 टक्के वाढ झाली आहे. अंदाजे 40 टक्के रुग्ण योग्य उपचार आणि प्रतिबंधात्मक धोरणांचे पालन करत नाहीत आणि त्यांना हा आजार पुन्हा बळावू शकतो. ट्यूमरच्या स्टेज आणि स्थानाच्या आधारावर डॉक्टर रुग्णाच्या उपचार पद्धतीचा निर्णय घेतात. चांगल्या आरोग्यासाठी आपल्या रोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. प्रक्रिया केलेले आणि फ्रोजन फूडचे सेवन टाळावे, वजन नियंत्रित राखावे. शारीरिकद़ृष्ट्या सक्रिय राहून धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. पोटाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो.