

अनेक पुरुषांना नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, ज्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि कामावरही होतो. जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल, तर तुमच्या आहारात काही गोष्टींचा तातडीने समावेश करणे आवश्यक आहे.
अनेकदा पुरुषांना सततचा थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. यामागे चुकीची जीवनशैली आणि काही वैद्यकीय कारणं असू शकतात. ॲनिमिया, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे आणि अयोग्य आहार यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. काही कारणं तर अशी आहेत, जी महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
चुकीची जीवनशैली, अपुरी झोप, व्यायामाचे असंतुलन आणि अयोग्य आहार हे थकवा आणि अशक्तपणासाठी जबाबदार असणारे मुख्य घटक आहेत. चला तर मग जाणून घेऊया की पुरुषांना ऊर्जा कमी का वाटते आणि ते आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी कशी वाढवू शकतात.
१. अयोग्य आहार शरीरात प्रथिने (प्रोटीन), आरोग्यदायी कर्बोदके (हेल्दी कार्ब्स) आणि आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. आहारात भरपूर भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते.
२. व्यायामाचे असंतुलन अनेकांना वाटतं की व्यायाम न केल्याने ऊर्जा कमी होते, पण काहीवेळा गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणेही थकव्याचे कारण ठरू शकते, विशेषतः वाढत्या वयानुसार. त्यामुळे वयानुसार संतुलित पद्धतीने व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
३. कमी टेस्टोस्टेरॉन टेस्टोस्टेरॉन हा एक महत्त्वाचा सेक्स हार्मोन आहे, जो शारीरिक आणि मानसिक ऊर्जा टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. पुरुषांचे वय जसजसे वाढते, तसतसे त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होते. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यामुळे (ज्याला हायपोगोनॅडिझम असेही म्हणतात) थकवा, ऊर्जेची कमतरता आणि नैराश्य येऊ शकते.
शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करू शकता.
सर्वात आधी भरपूर पाणी प्या. शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.
अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असलेली फळे आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा.
अंडी आणि चिकन यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ (प्रोटीन रिच फूड्स) खा, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होईल.