डॉ. दीप्ती पटेल
सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) हा सांध्यांमध्ये होणारा दाह (सूज) आहे जो सोरायसिस असलेल्या लोकांमध्ये उद्भवतो; प्रभावित सांधे सूजतात आणि बर्याचदा खूप वेदनादायी असतात. सामान्यतः संधिवातच्या लक्षणांचा विकास होण्याआधी सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) असलेल्या लोकांना काही वर्षांपूर्वी सोरायसिस होतो.
या प्रकारच्या संधिवातामध्ये चिन्हे आणि लक्षणे वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळी असतात. या स्थितीत लोकांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत.
– सुजलेले किंवा ताठर सांधे.
– स्नायूंमध्ये वेदना.
– त्वचेवर खवलेदार डाग.
– हाताचे बोट, पायाचे बोट, मनगट, टाच (पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा) आणि कोपर यांसारख्या लहान सांध्यांचा समावेश.
मुख्य कारणे :
सोरायसिसपासून निदान मिळालेल्या लोकांमध्ये सहसा काही वेळा नंतर सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) उद्भवतो. सोरायटिक संधिवात (आर्थरायटीस) जसे की सोरायसिस, हा तेव्हा उद्भवतो जेव्हा रोगप्रतिकारक प्रणाली निरोगी टिशुंवर हल्ला करतात. म्हणूनच याला ऑटोइम्युन स्थिती (स्वयंप्रतिकार स्थिती) म्हणतात. या हल्ल्यांना कशामुळे चालना मिळते हे स्पष्ट नाही, परंतु अनुवंशिक घटक आणि पर्यावरणीय घटक यांचे मिश्रण जसे की ताण, व्हायरस किंवा एखादी दुखापत यामागे भूमिका बजावते, असा विचार आहे.
निदान आणि उपचार
सांध्यांच्या समस्या किंवा ताठरतेच्या लक्षणांवर आधारित, डॉक्टर चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात आणि व्यक्तीला पुढील मूल्यांकनसाठी वैयक्तिक संधिवात शास्त्रज्ञांचा (रुमॅटोलॉजिस्ट) संदर्भ देऊ शकतात. संधिवाताचा प्रकार ओळखण्यासाठी काही सामान्य चाचण्या केल्या जातात जसे की एक्स-रे आणि रक्त तपासणी ज्याद्वारे इरिथ्रोसाइटस सेडीमेन्टेशन दर आणि सी-रीएक्टिव्ह प्रोटिनची वाढलेली पातळी बघता येते.
एक विशिष्ट औषध संधिवाताच्या प्रत्येक बाबतीत काम करू शकत नाही, म्हणून योग्य आणि प्रभावी औषध मिळण्याअगोदर अनेक औषधांची चाचणी केली गेली असू शकते. हालचाली आणि सांध्यांच्या समस्येत मदत करण्यासाठी शारीरिक उपचारासह अँटी-इंफ्लॅमेटरी आणि अँटी-रिह्युमेटिक औषधे निर्धारित केली जाऊ शकतात.कॉर्टिकोस्टिरॉईड्स, बायोलॉजिक्स किंवा इम्युनोस्प्रेशन्स सारखी औषधे देखील निर्धारित केल्या जाऊ शकतात.
संधिवात, बर्याच बाबतीत, सतत असतो आणि त्यापासून पूर्णतः सुटका मिळवणे आव्हान असू शकते; परंतु योग्य औषधोपचार आणि थेरपीसह याचे पुन्हा बळावणे टाळता येते.
उपचार
सोरायसिस संधिवात (आर्थरासिस) ही अशी स्थिती आहे, ज्याच्या उपचारासाठी ह्युमटॉलॉजिस्ट सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. बायोलॉजिक्ससारख्या प्रगत उपचार पद्धतींमुळेही या समस्येवर योग्यवेळी उपचार करणे शक्य होते.
कार्यरत जीवनशैली आणि संतुलित आहारासोबत (पीएसए) सोरायटिक संधिवाताच्या रुग्णांसाठी कार्यरत राहणे आणि व्यायाम अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण त्यामुळे लवचिकता वाढते आणि ताण कमी होतो. ताजे खाद्यपदार्थ जसे फळे व भाज्या तसेच साखर, फॅट आणि मीठ कमी असलेला निरोगी संतुलित आहार एकूणच आरोग्यात सुधारणा घडवतो. निकस आहाराचे सेवन केल्यामुळे थकवा व कंटाळा येतो आणि त्यामुळे पीएसएमध्ये भर पडू शकते. धूम्रपान बंद करण्याचाही सल्ला देण्यात येत आहे, कारण त्यामुळे उपचारात अडथळे निर्माण होऊ शकतात.
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या
जीवनशैलीतील सुधारणांशिवाय रुग्णांना लवकर निदान आणि उपचार करणे तसेच प्रक्रियेत अधिक विलंब न करणे महत्त्वाचे आहे. कारण, त्यामुळे समस्येचे गांभीर्य आणखी वाढू शकते.
व्यायामाची जोड
सांधेदुखीला आराम मिळावा याकरिताही व्यायामाची आवश्यकता आहे. तसेच आहारामध्ये ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असणे गरजेचे आहे.