Postpartum Health Tips | पोस्टपार्टम स्ट्रेस टाळायचाय? बाळंतपणानंतर फॉलो करा या खास आरोग्य टिप्स

Postpartum Health Tips | आई होणं हा एक सुंदर अनुभव असतो, पण डिलिव्हरीनंतर येणारा थकवा, वाढलेलं वजन आणि सततचा तणाव यामुळे अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
Postpartum Health Tips
Postpartum Health TipsCanva
Published on
Updated on

Postpartum Health Tips

आई होणं हा एक सुंदर अनुभव असतो, पण डिलिव्हरीनंतर येणारा थकवा, वाढलेलं वजन आणि सततचा तणाव यामुळे अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. गीतिका चोप्रा यांनी नवीन मातांसाठी काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे त्यांना निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत करतील.

Postpartum Health Tips
पावसाळ्यात फळे खावी की नको? काय आहे आरोग्यदायी

आई झाल्यानंतर निरोगी राहण्यासाठी काही सोपे उपाय:

  • मनाची काळजी घ्या: रोज थोडा वेळ फिरायला जा, प्राणायाम करा आणि मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तीला सांगा. बाळ झोपल्यावर तुम्हीही थोडी विश्रांती घ्या. गरज वाटल्यास समुपदेशकाची मदत घ्यायला संकोच करू नका.

  • सकस आहार घ्या: आहारात नाचणी, डाळी, अंडी, सुकामेवा आणि डिंकाचे लाडू यांचा समावेश करा. बाहेरचे पदार्थ, जास्त साखर, चहा-कॉफी टाळा. घरचे, साधे आणि पौष्टिक जेवणच सर्वोत्तम आहे.

  • भरपूर पाणी प्या: शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. दिवसभर साधे पाणी, जिऱ्याचे पाणी किंवा नारळ पाणी पित राहा.

  • व्यायामाची घाई करू नका: डिलिव्हरीनंतर लगेच व्यायाम सुरू करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू चालणे आणि योगा सुरू करा. शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ द्या.

  • स्तनपान महत्त्वाचे: बाळाला स्तनपान नक्की करा. हे आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे आणि यामुळे आईला नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासही मदत करते.

थोडक्यात सांगायचे तर, आई झाल्यानंतर स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे सर्वात महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, एक निरोगी आणि आनंदी आईच बाळाची उत्तम काळजी घेऊ शकते.

Postpartum Health Tips
Child Obesity Prevention Tips | लहान वयात मुलांचे वजन वाढतंय ? लठ्ठपणा टाळण्यासाठी करा हे 5 सोपे उपाय

आई होणं ही स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा अनुभव असतो. मात्र डिलिव्हरीनंतर शरीरामध्ये होणारे हार्मोनल बदल, वाढलेलं वजन, झोपेचा अभाव आणि नवजात बाळाची जबाबदारी यामुळे अनेक स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. यावेळी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, योग्य आहार, पुरेशी झोप, आणि सौम्य व्यायामाचा अवलंब करावा. तसेच, नैराश्य, चिडचिड आणि चिंता या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे.

डिलिव्हरीनंतरच्या काळात नव्या मातांनी पोषणयुक्त आहार घेतला पाहिजे, ज्यात प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम आणि इतर आवश्यक मिनरल्सचा समावेश असावा. घरगुती साधे पण पौष्टिक अन्न, भरपूर पाणी पिणं, आणि दररोज थोडा वेळ स्वतःसाठी देणं ही आरोग्य टिकवण्याची गुरुकिल्ली आहे. शिवाय, मानसिक शांततेसाठी प्राणायाम, ब्रीदिंग टेक्निक्स आणि कुटुंबाचा भावनिक आधार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अशा छोट्या पण प्रभावी उपायांनी आई स्वतः निरोगी राहून आपल्या बाळालाही उत्तम काळजी देऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news