

पुढारी ऑनलाईन डेस्क : Parenting Tips | कडक उन्हाळा आणि परीक्षेचा ताण मुलांची दमछाक करणारा असतो, त्यामुळे पालकांनी या काळात मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. परीक्षेच्या काळात मुलांचं शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवणं खूप गरजेचं असतं. यासाठी मुलांना योग्य आहार दिल्यास लक्ष केंद्रित करणं, स्मरणशक्ती आणि ऊर्जा टिकवण्यास मदत होते. पालकांनो कडक उन्हाळ्यात परीक्षेदरम्यान तुमच्या मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी...
सुकामेवा : बदाम, अक्रोड, खजूर – हे मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर असतात.
बीजं : जवस, चिया सीड्स यामध्ये ओमेगा-३ असते जे मेंदूसाठी उपयुक्त आहे.
मुलांना रोज सकाळी नियमित वेळेत नाश्ता द्या.
नाश्ता काय द्यावा : पोहे, उपमा, अंड्याचं आमलेट, फळं, दूध किंवा ड्रायफ्रूट्स घालतेला शिरा.
आहार पचायला हलका पण पोषणमूल्ययुक्त असावा.
घरगुती जेवण द्या : वरण-भात, चपाती, भाजी, कोशिंबीर.
फळांचे तुकडे, मखाणे, पीनट बटर ब्रेड, घरगुती शेंगदाण्याची चिक्की.
भरपूर पाणी व थंड पेये
मुलं अभ्यास करताना पाणी पित नाहीत, त्यामुळे आठवण करून द्या.
लिंबूपाणी, ताक, ओआरएस, नारळपाणी हे उत्तम पर्याय आहेत.
भर उन्हामध्ये चिप्स, कोल्ड ड्रिंक्स टाळा.
जास्त साखर व जंक फूड टाळा, त्यामुळे सुस्ती आणि थकवा येतो.
जास्त चहा-कॉफी यामुळे झोप कमी होते पण चिडचिड होते.