मयुरा अ. जाधव वाचस्पतीविधिज्ञ
माशाचे तेल हे लाँग चेन फॅटी अॅसिड म्हणजे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेली लांब शृंखला असंपृक्त स्निग्धाम्ले आहेत. ती लहानथोेर स्त्री-पुरुषांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.परंतु, शरीर ते स्वत: बनवू शकत नाही. त्यामुळे ते आहारातून घ्यावे लागते. याच्या सेवनाने मानसिक विकार व चिंतेचे प्रमाण कमी होते.
धर्म-अर्थ-काम-मोक्षाणां आरोग्यंमूल उत्तमं।(चरक संहिता 1/24) अर्थात; ती कर्तव्ये जी आपल्याला सत्यमार्गावर चालण्यास समर्थन देतात तो धर्म. जमीन, सोने, पैसा अशी भौतिक संपत्ती म्हणजे अर्थ.विषय भोगण्याची इच्छा व अखंड कर्म करणे, कार्यरत राहणे म्हणजे काम. सर्व आसक्तीपासून मुक्त म्हणजे मोक्ष. स्त्री-पुरुषाला उत्तम आरोग्यामार्फत या चारही तत्त्वांची प्राप्ती होते. म्हणून प्रात:समयी नित्य व्यायाम व योगसाधना करावी.
ओमेगा 3 चे शाकाहारी व जलचर स्रोत :-
ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे पॉली अनसॅच्युरेटेड वसाचे रूप आहे. याचे पुढील तीन प्रकार आहेत. 1) अल्फा लिनोलेनिक अॅसिड, 2) डोकोसाहेक्साएनोइक अॅसिड, 3) ईकोसापेन्टैनेनोइक अॅसिड. एएएल हे पौध्यामध्ये असते. तर डीएचए व ईपीए माशांपासून मिळते. शाकाहारी व माशांपासून मिळणार्या ओमेगा अॅसिडच्या मात्रा व गुणवत्तेमध्ये फरक असतो. डीएचए 240 एमजी व ईपीए 360 एमजी हे आदर्श प्रमाण मानले जाते.फ्लेक्सी सिडस्, अलसी बी, राजमा, अक्रोड या शाकाहारी पदार्थात ओमेगा 3 असते. सालोमन, सारडिन, अॅनकोव्ही मासे यात हे विपूल असते. खोल व थंड समुद्री पौधे, शैवाल हा डीएचएचा वास्तविक स्रोत आहे. मासे त्यांचे सेवन करतात. जसे अन्न तशी प्रकृती बनते. सालोमन फिश उच्च गुणवत्तेची पौष्टिक मूल्ये असलेला मासा म्हणून जगभर ओळखला जातो.
इतर माशांच्या तुलनेत थंड पाण्यातील सालोमनमध्ये मर्क्युरीचे प्रमाण नगण्य आढळते. त्यामुळे बॉलीवूड अभिनेते व अभिनेत्री यांच्या रोजच्या जेवणामध्ये स्टिम्ड सालोमन फिश असतो. सामान्य व्यक्ती पापलेट, सुरमाई, बोंबील, कोळंबी असे खिशाला परवडणारे मासे खातात. ते वाफलून खाण्याऐवजी तवा फ्राय, तंदूर फ्राय पद्धतीने वनस्पती तेलात तळतात. त्यामुळे वास, चव व आकर्षकपणा वाढतो. परंतु, माशांची त्वचा करपल्याने त्यातील पोषक तत्त्वे कमी होतात. जसे की फळांच्या सालीत जीवनसत्त्वे असतात म्हणून सफरचंद, द्राक्षेसारखी फळे सालीसहीत खातात. माशाचे तेल कमी होऊन शेंगतेलाचा तवंग जास्त दिसतो. भारतीयांच्या जेवणातील व्हेजिटेबल्स ऑईलमध्ये ओमेगा 6 जास्त प्रमाणात असते. त्याला बॅलन्स करण्यासाठी ओमेगा 3 घ्यावे लागते. त्यांचे प्रमाण 6:1 आदर्श मानले जाते. ओमेगा 3, 6, 9 यांचे संतुलित प्रमाण, राईट बॅलन्स शरीराला उत्तम रिझल्ट देते.
मासे प्रशीतन (रेफ्रिजरेशन)करण्याच्या पद्धती :-
माशात अनेक जीवाणू असतात. मासे पाण्याबाहेर काढल्यावर, मेल्यावर ते कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. ते शीघ्र उपघटित, डिकम्पोझ होऊन नष्ट होऊ लागतात. त्यांना शून्य अंश तपमानाला डिपफ्रिझमध्ये परिरक्षित केल्यानेे मासे सडण्याची क्रिया थांबते. मोठ्या माशांचे आहारनाल काढून त्यात बर्फ भरला जातो. मोठ्या श्रेणीतील माशाचे डोके कापले जाते. आहार नली काढून स्वच्छ धुतले जाते. डिप फ्रिझमध्ये मायनस अठरा डिग्री तपमानाला ठेवले जाते.याशिवाय फ्रिझ ड्राईंग, सन ड्राईंग,मोना क्युअरिंग, लवणन, नम उपचार, धूमन, डब्बाबंद अशा विविध पद्धतींनी मासे दीर्घकाळ उत्तम अवस्थेत टिकतात. या सर्व पद्धती खर्चिक असल्याने बाजारात चांगल्या दर्जाचा पौष्टिक मासा महाग मिळतो.
गौरी फिरायला गोव्याला गेली होती. तेथे स्वस्तात मासे खरेदी केले. थर्मोकोलच्या बॉक्समध्ये बर्फ भरून त्यात मासे ठेवले. प्रवासात गाडीच्या उष्णतेने डिक्कीत ठेवलेल्या बर्फाचे पाणी झाले. सर्वांना जेवणासाठी आमंत्रण दिले. अन्न समोरच्याचे असले तरी पोट आपले असते. त्यामुळे मी जेवणास नकार दिला. मी एवढं प्रेमाने बोलावले आणि तुम्ही नाकारताय? म्हणून गौरीला राग आला. अन्नाचा अपमान करणे ही आमची संस्कृती नाही असे म्हणत इतर मैत्रिणी जेवायल्या गेल्या. दुसर्या दिवशी मी एकटीच जीमला गेले आणि इतर जणी पोटविकार तज्ज्ञांकडे! त्यावेळी मी म्हणाले, खाणे के साथ नो इक्स्पेरिमेंट। टेक प्रॉपर फूड प्रिझर्वेशन टेक्निक अँड मेकिंग ट्रेनिंग.
जनाब मत पालिए अहंकार को इतना। वक्त के सागर मे कई सिकंदर डूब गए है॥
माशाचे तेल केव्हा घ्यावे :-
रात्रीच्या मुख्य जेवणाबरोबर फिश ऑईल सप्लिमेंट घेतात. कारण झोपेत शरीर अंतर्गत मरम्मत व स्नायूंची दुरुस्ती करते. फिश ऑईलमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी एजंट असतात. ते शरीराला रिकव्हरी व रिगु्रप करण्यासाठी मदतगार होतात. रात्रीचे जेवण पोषक तत्त्वांनी परिपूर्ण हवे, तसेच जेवणात मुख्य न्यूट्रियंट गुडफॅट हवेत. फॅटला पचविण्यासाठी शरीरामध्ये पॅनक्रियाटिक लायपेज इंझाईम्स स्त्रवतात. तेच फिश ऑईलचे पाचनसुद्धा जलद करतात. फिश ऑईल घेताना जेवणात दुग्धजन्य पदार्थ नसावेत, कारण दूध हळू पचते. लॅक्टोस टॉलरन्स व तेल याविरुद्ध अन्नाने पचनसंस्थेवरील ताण वाढतो. डायझेशनमध्ये दिक्कत येऊ शकते. मछलीच्या तेलाचा ढेकर येतो. इंटरिक कोटेड सॉफ्टजेल घेतल्यास ढेकरपासून मुक्ती मिळते. केरळची सुप्रसिद्ध कहावत पुढीलप्रमाणे,मछली को खाकर स्वास्थ का रखो तुम ध्यान। तभी बनोगे तुम सबसे महान।
माशाच्या तेलाचे (फिश ऑईल) चे फायदे :-
माशाचे तेल हे लाँग चेन फॅटी अॅसिड म्हणजे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेली लांब शृंखला असंपृक्त स्निग्धाम्ले आहेत. ती लहानथोेर स्त्री-पुरुषांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. परंतु, शरीर ते स्वत: बनवू शकत नाही. त्यामुळे ते आहारातून घ्यावे लागते. याच्या सेवनाने मानसिक विकार व चिंतेचे प्रमाण कमी होते. मस्तिष्कात पॉली अनसॅच्युरेटेड अॅसिड चाळीस टक्के आणि डोळ्यांच्या रेटिनामध्ये साठ टक्के असते. डीएचएमुळेे मस्तिष्क निरोगी राहते.बुद्धी व स्मृती तेज होते. मस्तिष्कसंबंधी विकार कमी करते.वय वाढल्याने होणारे स्मृतिभ्रंश, कमजोर याददाश यांचा कालावधी वाढविते.डोळ्यांची रोशनी तेज होते. मैक्युलर डिजनरेशनसारख्या डोळ्यांमध्ये धुंधलापण आणणारी समस्या कमी करते. इपीएच्या सेवनाने हार्ट फंक्शनिंग इंप्रूव्ह होते. हार्ट अॅटॅकच्या प्रमाणात घट होते. हे रक्तामध्ये असलेल्या प्लेटलेटस् एकमेकांशी चिकटण्याला प्रतिबंध करते.
सांध्यांना लवचिक बनवून हाडांमधील कॅल्शियम मात्रा वाढविते. प्रतिरक्षा तंत्र मजबूत करते. अनहोनी सूज कमी करते. मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी करते. हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन कोलेस्ट्रॉल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढविते. तर लो डेन्सिटी लिपोप्रोटिन कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करते. माशांपासून परिपूर्ण आहार रोज बनविणे व वेळेवर खाणे अवघड असते. मेंदू व हृदय निरोगी राखायचे असेल तर योग्य फिश ऑईलचा पुरवठा करायला हवा. ती आहारातून मिळाली तर उत्तमच! तसेच सप्लिमेंट, त्वचेला लावण्यात येणारी ब्युटिक्रिम्स व तेलातून मिळाली याच्याशी शरीराचा काही मतलब नसतो. मनुष्य शाकाहारी आहे का मांसाहारी हे महत्त्वाचे नाही तर प्रत्येक व्यक्तीने पर्याप्त मात्रेत ओमेगा 3, 6, 9 खाल्ले पाहिजे. म्हणून क्रियाशील व व्यायाम करणार्या स्त्रिया डॉक्टरांच्या सल्ल्याने जेवणाबरोबर एक डबल स्ट्रेंथ सालोमन फिश ऑईल किंवा वनस्पतीपासून बनलेली सॉफ्टजेल खातात. डीएचए व इपीएची कमतरता भरून काढतात. मस्तिष्क आणि हृदय तंदुरुस्त ठेवतात. सी फूड स्पेशली फिश, इज नॉट जस्ट इटिंग एनर्जी बट इटस् अॅन एक्सपिरियन्स…!!!