Morning Weightloss Tips | वजन कमी करायचंय? मग रोज सकाळी करा 'हे' 5 उपाय

Weightloss Tips | सकाळच्या 'या' सवयी वजन कमी करण्यासाठी ठरतात फायदेशीर
morning habits for weight loss
morning habits for weight lossCanva
Published on
Updated on

Morning Habits For Weight Loss

वजन कमी करायचंय पण वेळ मिळत नाही? मग सकाळी ८ वाजण्यापूर्वीचे 'हे' पाच सोपे उपाय तुमच्या शरीरात मोठा बदल घडवून आणू शकतात. आजच्या धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात सकाळीच होते.

morning habits for weight loss
Low Calorie Diet : वजन कमी करण्यासाठी 'लो कॅलोरी डाएट' फायदेशीर की धोकादायक?

1. लवकर उठण्याची सवय लावा

सकाळी लवकर उठल्याने शरीराचं नैसर्गिक चक्र (बायोलॉजिकल क्लॉक) सुरळीत राहतं. लवकर उठून थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवा, कारण त्यातून मिळणारा व्हिटॅमिन D तुमचं मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन कमी होण्यास मदत करतो.

2. कोमट पाणी प्या

उठल्यावर लगेच कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. हवे असल्यास त्यात लिंबू किंवा मध टाकून डिटॉक्स वॉटर तयार करू शकता.

3. योग किंवा हलकी कसरत

सकाळी ३० ते ४५ मिनिटं योगासनं किंवा थोडी कसरत करा. सूर्यनमस्कार, प्राणायाम हे शरीर आणि मन दोन्हींसाठी फायदेशीर आहेत. यामुळे मेटाबॉलिझम वाढतं आणि मानसिक तणाव कमी होतो.

morning habits for weight loss
International Tea Day : चहा पिताना आपणही करताय का ‘या’ आरोग्यघातक चुका?

4. सकाळचं नाश्ता चुकवू नका

सकाळी ८ वाजण्यापूर्वी प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असलेला पौष्टिक नाश्ता करा. उदा. अंडी, ओट्स, फळं, ड्रायफ्रुट्स यांचा समावेश असलेला नाश्ता दिवसभरासाठी ऊर्जा देतो.

5. मोबाईलपासून लांब रहा

उठल्या-उठल्या मोबाईलकडे हात नेण्याऐवजी थोडा वेळ पुस्तक वाचण्यासाठी द्या. यामुळे मानसिक शांतता मिळते आणि दिवसभर लक्ष केंद्रित राहण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news