Smartphone Radiation Effects on Heart: शर्टच्या खिशात मोबाईल ठेवण्याच्या सवयीमुळे ह्रदयाचे ठोके बदलतात? डॉक्टरांचा सल्ला काय?

शर्टाचा खिसा हा सहसा डाव्या बाजूलाच असतो आणि तिथंच आपलं ह्रदय देखील असतं.
Smartphone Radiation Effects on Heart
Smartphone Radiation Effects on Heartpudhari
Published on: 
Updated on: 

mobile phone in shirt pocket heart risk: मोबाईल स्मार्ट फोन हे आता काही एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण राहिलेलं नाही. ते मनुष्याच्या शरीराचाच एक भाग झाल्यासारखे आहेत. मोबाईलचा शोध लागल्यापासून तो माणसाच्या जवळच आहे. एक तर तो पँटच्या नाहीतर शर्टच्या शिखात असतो. अनेकांना मोबाईल आपल्या ह्रदयाच्या जवळ ठेवायला खूप आवडतं.

शर्टाचा खिसा हा सहसा डाव्या बाजूलाच असतो आणि तिथंच आपलं ह्रदय देखील असतं. मोबाईलचे व्हायब्रेशन आणि त्यातून निघणारे सिग्नल्स हे आपल्या ह्रदयाच्या ठोक्यांवर परिणाम तर करत नाहीत ना अशी काही लोकांना भीती असते. सोशल मीडियावर देखील अनेक दावे केले जातात. मात्र त्यात सत्यता किती आहे हे आपण कार्डिओलॉजिस्ट कुब्बा यांच्याकडूनच जाणून घेऊयात.

Smartphone Radiation Effects on Heart
Earbuds Without Smartphone | आता स्मार्टफोन्सशिवाय चालणार इअरबडस्

शर्टच्या खिशातील फोनचा ह्रदयावर परिणाम?

मोबाईल फोन ह्रदयाच्या जवळ ठेवण्याने ह्रदयाचे ठोके बदलतात का यावर डॉक्टर कुब्बा यांनी सांगितलं की, सहसा मोबाईलच्या व्हायब्रेशन आणि सिग्नलमुळे ह्रदयाचे ठोके बदलले आहे याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. फोन हा रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलचा वापर करतात. हे सिग्नल नॉन आयनाईजिंग असतात. त्यामुळं त्यात एक्स-रे मध्ये असते तशी आयनायजिंग रेडिएशनमुळं डीएनएला थेट नुकसान पोहचवणारी उर्जा नसते.

Smartphone Radiation Effects on Heart
Smartphone Sales: मोबाईल विक्रीचा दशकातील नीचांक! 'मेमरी चिप' महागल्याने मोबाईल खरेदी 'सायलंट मोड'वर, विक्रीत कमालीची घट

फोनच्या व्हायब्रेशनचा हार्टबीटवर परिणाम?

ज्यावेळी तुम्ही शर्टाच्या खिशात मोबाईल ठेवता अन् तो व्हायब्रेट होतो त्यावेळी ह्रदयाच्या जवळ काहीतरी होतं. मात्र हे काहीतरी होणं म्हणजे ह्रदयाचे ठोके बदलले असं होत नाही. डॉक्टरांच्या मते व्हाब्रेशनमुळे त्या भागात सेन्सेशन जाणवते. जर तुम्ही तुमच्या हार्टबीटबाबत चिंतेच असाल किंवा शरीरात होणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टावर जास्त लक्ष देत असाल तर तुमचे सामान्य असलेले ह्रदयाचे ठोके देखील जास्त वाटू शकतात. प्रत्येक वेळी मोबाईलचे व्हायब्रेशन आणि ह्रदयाचे ठोके यांचा संबंध जोडणे योग्य नाही.

Smartphone Radiation Effects on Heart
Schedule H Drug Misuse: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय शेड्युल-H औषधांची विक्री धडाक्यात!

कोणी सावधगिरी बाळगावी?

ज्या लोकांच्या शरीरात पेसमेकर बसवला आहे किंवा दुसरे इम्प्लांटेड हार्ड डिवाईस बसवले आहे त्यांनी काळजी घ्यावी. काही फोनमधील मॅग्नेट अशा पेसमेकर किंवा इम्प्लांटेड डिवाईसच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम करू शकतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ज्यांनी असे डिवाईस लावले आहेत त्यांनी त्यापासून कमीत कमी ६ इंच किंवा १५ सेंटीमीटर लांब मोबाईल ठेवावा असा सल्ला दिला आहे. त्यामुळं तिथं हे डिवाईस लागले आहे तिथल्या खिशात मोबाईल ठेवणे योग्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news