

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित ठेवणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवल्यास हृदय विकार, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांचा धोका कमी होतो. यासाठी आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे आवश्यक आहे.
आपल्या रक्तात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात गुड कोलेस्ट्रॉल (HDL) आणि बॅड कोलेस्ट्रॉल (LDL). त्यातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयापर्यंत रक्तपुरवठा अडथळलेला राहतो, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. खालील सवयी अंगीकारल्यास वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊ शकते:
कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रोसेस्ड अन्न टाळून फळे, सुका मेवा, बियाणं, मासे आणि ऑलिव्ह तेलाचा आहारात समावेश करा. ‘हेल्दी फॅट्स’ वाढवण्याचा प्रयत्न करा. अशा आहारामुळे हृदयविकाराचा धोका सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
डायटप्रमाणेच शारीरिक हालचाली करणेही अत्यंत आवश्यक आहे. सप्ताहात किमान १५० मिनिटांचा व्यायाम HDL वाढवून LDL कमी करतो. यामुळे शरीरातील प्लाक बिल्डअप कमी होतो आणि रक्तप्रवाह सुधारतो.
जास्त वजनामुळे कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांचा धोका वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे अत्यावश्यक आहे. लठ्ठपणा असल्यास आर्टरीजमध्ये प्लाक तयार होतो, जो हृदयविकाराचं मुख्य कारण असतो.
दैनंदिन आयुष्यात तणाव अनिवार्य आहे, पण त्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. दीर्घ काळ तणावात राहिल्यास मेंदूत कोर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि ‘गुड कोलेस्ट्रॉल’वरही परिणाम होतो.
स्मोकिंगमुळे फुफ्फुसे आणि यकृत यांच्यावर ताण येतो. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या अस्तराचे नुकसान होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणखी वाढते.
युवकांसाठी दररोज ८ ते ९ तासांची झोप आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वेगाने वाढतो. यामुळे थकवा, चिडचिड आणि हृदयविकाराचेही प्रमाण वाढू शकते.