Menstrual Cramp Home Remedies | मासिक पाळीतील असह्य वेदनांपासून सुटका हवीये? ट्राय करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Menstrual Cramp Home Remedies | अनेक महिलांसाठी मासिक पाळीचे ते काही दिवस खूपच वेदनादायी असतात. काही वेळा हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे रोजची कामं करणंही कठीण होऊन बसतं.
Menstrual Cramp Home Remedies
Menstrual Cramp Home Remedies Canva
Published on
Updated on

Menstrual Cramp Home Remedies

अनेक महिलांसाठी मासिक पाळीचे ते काही दिवस खूपच वेदनादायी असतात. काही वेळा हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे रोजची कामं करणंही कठीण होऊन बसतं. अशा वेळी मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या या वेदनांना वैद्यकीय भाषेत 'डिस्मेनोरिया' (Dysmenorrhea) असं म्हणतात.

Menstrual Cramp Home Remedies
Lack Of Sleep Side Effects| झोप पूर्ण न झाल्याने शरीरात होऊ शकतात हे ६ गंभीर आजार, तज्ज्ञांनी दिली माहिती

सामान्यतः पाळीच्या दिवसांमध्ये पोटाच्या खालच्या भागात, कंबरेत किंवा मांड्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात. यासोबतच काही महिलांना डोकेदुखी, मळमळ आणि थकवा अशा समस्यांचाही सामना करावा लागतो. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात. या उपायांनी वेदनांपासून त्वरित आराम मिळू शकतो.

बडीशेपचं पाणी

जर तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम हवा असेल, तर बडीशेपचं पाणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. हे पाणी तयार करण्यासाठी एक चमचा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून प्या. या उपायामुळे पोटात येणारी कळ कमी होते आणि मासिक पाळी नियमित होण्यासही मदत मिळते.

Menstrual Cramp Home Remedies
Immunity Booster Kadha | पावसाळ्यातील आजारांवर स्वयंपाकघरातच करा उपाय; इम्युनिटी वाढवण्यासाठी बनवा हे २ खास काढे

तीळ आणि गूळ

जर तुम्ही मासिक पाळीच्या त्रासाने त्रस्त असाल, तर तीळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. याचं सेवन करण्यासाठी, १ ते २ चमचे तीळ घ्या आणि ते गुळामध्ये मिसळून त्याच्या लहान गोळ्या तयार करा. मासिक पाळी सुरू होण्याच्या २ ते ३ दिवस आधी आणि पाळी सुरू झाल्यावर दिवसातून १ ते २ वेळा या गोळ्यांचं सेवन करा.

तिळामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स स्नायूंना आराम देतात, ज्यामुळे वेदना कमी होतात. तर गूळ शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतो. चव वाढवण्यासाठी तुम्ही तीळ हलके भाजूनही खाऊ शकता, ज्यामुळे चवीसोबतच पचनक्रियाही सुधारेल.

गरम पाण्याचा शेक

जर तुम्ही मासिक पाळीच्या वेदनांनी हैराण असाल, तर त्वरित आराम मिळवण्यासाठी गरम टॉवेल किंवा हीटिंग पॅडची (Heating Pad) मदत घेऊ शकता. वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी टॉवेल किंवा हीटिंग पॅडला पोटावर आणि कंबरेच्या खालच्या भागावर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा.

उष्णतेमुळे त्या भागातील रक्ताभिसरण सुधारतं आणि स्नायूंना आलेला आखडलेपणा कमी होतो. यामुळे वेदनांपासून लगेचच आराम मिळतो. जर वेदना जास्त असतील, तर दिवसातून २ ते ३ वेळा हा उपाय करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news