

Heart Attacks for Women: कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो, हे कारण तरुण आणि वृद्ध रुग्णांसारखेच असते, असे आजवर डॉक्टर्स गृहीत धरत होते. मात्र, ६५ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या सुमारे ३,००० लोकांच्या १५ वर्षांच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विशेषतः महिलांसाठी ही धारणा चुकीची असू शकते. १५ वर्षांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनात ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सुमारे ३,००० लोकांचा समावेश होता. 'जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी'मध्ये १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे दिसून आले आहे की, तरुण स्त्रियांना आलेल्या निम्म्याहून अधिक हृदयविकाराच्या झटक्यांची कारणे पारंपरिक धमन्यांमधील अडथळ्यांपेक्षा वेगळी होती. या संशोधनामुळे आपत्कालीन कक्षांमध्ये तरुण रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे निदान आणि उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये व्यापक बदल घडू शकतात, असा विश्वासही संशोधकांनी व्यक्त केला आहे.
१५ वर्षांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनात ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सुमारे ३,००० लोकांचा समावेश होता. 'जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी'मध्ये १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे दिसून आले आहे की, तरुण स्त्रियांना आलेल्या निम्म्याहून अधिक हृदयविकाराच्या झटक्यांची कारणे पारंपरिक धमन्यांमधील अडथळ्यांपेक्षा वेगळी होती.
ऑक्टोपस (६५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये ओल्मस्टेड कार्डियाक ट्रोपोनिन) नावाच्या या अभ्यासात, तरुणांमध्ये हृदयविकार समजून घेण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोनाचा वापर झाला. २००३ ते २०१८ दरम्यान संशोधकांनी मिनेसोटा येथील ओल्मस्टेड काउंटीमध्ये ज्यांच्या हृदयाच्या स्नायूंना नुकसान झाल्यावर बाहेर पडणारे प्रथिन ट्रोपोनिनचे प्रमाण ६५ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला.हृदयाच्या स्नायूंना नेमके कशामुळे नुकसान होते यावरील संशोधनात प्रत्येक हृदयविकाराच्या झटक्याचे सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. यामध्ये पारंपारिक धमनी ब्लॉकेज (अॅथेरोथ्रोम्बोसिस), कोरोनरी आर्टरी डिसेक्शन (SCAD), शरीराच्या इतर भागातून रक्ताच्या गुठळ्या (एम्बोलिझम), धमनी स्पॅम, पुरवठा-मागणी विसंगती आणि अन्य अस्पष्ट लक्षणे यांचा समावेश केला गेला.
तरुण पुरुषांमध्ये ७५ टक्के हृदयविकाराचे झटके पारंपारिक धमनी अडथळ्यांमुळे आले होते, असे स्पष्ट झाले. तर महिलांमध्ये फक्त ४७ टक्के हृदयविकाराचे झटके पारंपारिक धमनी अडथळ्यांमुळे आले, असे समोर आले. उर्वरित ५३ टक्के महिलांमध्ये हृदयविकाराचे झटके हे अन्य कारणांमुळे आल्याचे स्पष्ट झाले.हृदयविकाराचा झटका येवून गेलेल्या महिला पुरुषांइतक्याच आजारी होत्या. अँजिओग्रामवर धमनी रोगाचे प्रमाण समान प्रमाणात दिसून आले. तथापि, या महिलांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त होते. यावरुन ज्या महिलांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे त्यांना पुरुषांपेक्षा हृदयविकाराची जास्त जोखीम असल्याचेही स्पष्ट झाले.
महिलांमध्ये नेहमीच छातीत दुखणे हे हृदयविकाराचे लक्षण दिसून येत नाही. त्याऐवजी त्यांना मळमळ, अपचन, वरच्या ओटीपोटात दुखणे, चक्कर येणे, जबड्याच्या डाव्या बाजूला लालसरपणा किंवा सूज नसताना वेदना होणे, धाप लागणे, घाम येणे आदी लक्षणेही हृदयविकाराची असू शकतात.सर्व हृदयविकाराचे झटके सारखे नसतात. तसेच एकाच कारणामुळे ते येतात असे नाही. तुम्ही तरुण, निरोगी आणि महिला असणे हृदयविकारापासून सुटका दिली, अशी हमी देत नाही. प्रत्येकाने आपल्या शरीरात होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा तीव्र श्रम थकवा जाणवत असेल, तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या, असे नवीन संशोधन सांगते.