

स्त्रियांच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. त्यात स्तनाचा कर्करोग आणि गर्भपिशवी मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, किशोरवयीन मुलींच्या लसीकरणातून गर्भपिशवी मुखाचा कर्करोग थांबवणे शक्य आहे, अशी भूमिका कर्करोग संशोधक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडली आहे. (Uterine Cancer)
केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गर्भपिशवी मुरवाच्या २ कर्करोगाच्या निर्मूलनासाठी एचपीव्ही लसीकरण राष्ट्रीय कार्यक्रम करण्याची घोषणा केली आहे.
गर्भाशयाच्या मुरवाशी होणारा कॅन्सर हा पेशीतील असाधारण बदलामुळे होतो. मात्र, तो टाळता येणे शक्य आहे. यासाठी जनजागृती आणि एचपीव्ही लसीकरण आवश्यक आहे.
एचपीव्ही या विषाणूपासून होतो गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधाचा पहिला मार्ग किशोरवयीन मुलींचे एचपीव्ही लसीकरण भारतात सिक्कीममध्ये राज्य सरकारकडून लसीकरण मोफत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात यावर विचारच झालेला नाही सिरम इन्स्टिट्यूट आणि मर्क या कंपन्यांच्या प्रतिबंधात्मक लसी उपायांवर समाज अन् केंद्र सरकारने गंभीरपणे विचार करणे गरजेचे.
लसीमुळे एचपीव्ही १६ आणि एचपीव्ही १८ यापासून होणाऱ्या कर्करोगापासून संरक्षण मिळते. यावर प्रतिबंध करण्यासाठी ३० वर्षांवरील सर्व स्त्रियांची एचपीव्हीची तपासणी बंधनकारक करणे गरजेचे आहे. सिस्म इन्स्टिट्यूटची लस दोन टप्प्यांत घेता येते. ९ ते १४ वर्षे वयोगटात दोन डोस व १५ ते २६ वयोगटात तीन डोस घेऊन कर्करोगाचा धोका टाळता येऊ शकतो.
एचपीव्ही तपासणी करणाऱ्या स्त्रियांनी तसेच कर्करोगावर मात केलेल्या स्त्रियांनी इतर स्त्रियांना तपासणी करण्याबाबत आवाहन केले पाहिजे, कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरणाविषयी शासन स्तरावर जनजागृती होणे गरजेचे आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट आणि मर्क या संस्थांच्या कर्करोग प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध आहेत. या लसी किशोरवयीन मुलीना व मुलांना देण्यासाठी शासन स्तरावर मोफत लसीकरण कार्यक्रम राबवला पाहिजे.
- डॉ. स्मिता जोशी, कर्करोग उपचारतज्ज