

पाटण : कोयना धरणांतर्गत विभागात पावसाने उघडीप दिल्याने धरणांतर्गत विभागातून प्रतिसेकंद केवळ 17,270 क्युसेक इतक्याच पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी धरणाच्या दरवाजांतून सोडण्यात येणारे पाणी बंद केले. धरणात आता 86.34 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
सध्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2,100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहेत. कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने त्यांतर्गत विभागातील ठप्प दळणवळण आता पूर्ववत झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 18.91 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.