लठ्ठपणा कमी करायचाय, तर बीट खा! जाणून त्याचे आरोग्यदायी फायदे

Health benefits of beetroot | आरोग्यदायी बीट
 arogya news
आरोग्यदायी बीटpudhari photo
Published on
Updated on
डॉ. गीताली मोहिते

गडद लाल रंगाचे बीट हे कंदमूळ संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते. बीट ही द्विवर्षीय वनस्पती असून, तिचे मूळ मांसल असते. बिटाची पाने आणि कंदाचा आहारात वापर केला जातो. बिटाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी भाजीचा बीट म्हणजे टेबल बीट आणि साखरेचा बीट म्हणजे शुगर बीट हे प्रकार व्यापारीद़ृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

भाजीच्या बीटच्या मुळ्यांमध्ये कर्बोदके व प्रथिने आणि उष्मांक कमी असून, आयर्न, (लोह), जीवनसत्त्व B9, Vit C, Folate, sodium, Pottassium, Calcium, sulfer, chloring, iodine, fibers मुबलक प्रमाणात असतात. बीटरूटला गडद लाल रंग मिळतो तो Beta- laines मुळे Beet antioxidant म्हणूनही कार्य करते. आकर्षक रंग येण्यासाठी स्वयंपाकात कोशिंबीर, सूप, भाज्या, बर्फी, ज्यूस, पराठा, जेली इ. तयार करताना बीट वापरले जाते.

जेवणाची रंग, चव वाढण्याबरोबरच अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी बीटचा वापर केला जातो. रक्त कमी असणार्‍या व्यक्तींमध्ये रक्तवाढीसाठी, फोलेटची कमतरता असलेल्या गर्भवती महिलांना बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. बीट सेवनाने त्वचा चमकदार आणि सुंदर राहते.

बिटामध्ये कॅलरीज् कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी याचा वापर होतो. बिटामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजेही असल्यामुळे, जसे कॅल्शिअम, फॉस्फरस, सांधेदुखीचा त्रास असणार्‍यांनी याचे सेवन करावे. हाडे, दात, हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

उच्च रक्तदाब असणार्‍यांनी बिटाचे सेवन केल्यास हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. कॅन्सरच्या रुग्णांनाही बीट खाण्याचा सल्ला दिला जातो.

बिटामध्ये साखर असते, म्हणून मधुमेहींनी बीट जपून खावे. जर एखाद्या व्यक्तीला oxalate आधारित kidney stone ची समस्या असेल, तर त्यांनी बीटरूटपासून लांब राहावे. ज्यांना लो B.P. म्हणजे रक्तदाब कमी होण्याचा त्रास असेल त्यांनी बिटाचा जपून वापर करावा. आहारात बिटाचा समावेश कराल, तर शरीरातील अनेक पोषक घटकांची कमतरता भरून निघते.

 arogya news
Eye Allergy | अॅलर्जी डोळ्यांची

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news