Eye Allergy | अॅलर्जी डोळ्यांची

डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमुख लक्षणे आहेत डोळ्यांतील सूज आणि खाज.
Eye Allergy
Eye AllergyFile Photo
Published on
Updated on

- डॉ. राजेश पाटील

डोळ्यांच्या अॅलर्जीचे प्रमुख लक्षणे आहेत डोळ्यांतील सूज आणि खाज. त्याशिवाय पापणीची कातडी काळी पडते, कातडीवर छोट्या सुरकुत्या येतात आणि कातडी कोरडी वाटते. बऱ्याचदा डोळ्यांना उजेड सहन होत नाही आणि उजेडामुळे डोळे आपोआप बंद होतात. लहान मुलांनाही अॅलर्जीचे विविध त्रास होतात अशा वेळी डोळ्यांची निगा कशी राखायची याविषयी...

अनेक कारणांमुळे अॅलर्जीचे प्रमाण वाढत आहे. त्यातील प्रमुख कारण आहे प्रदूषण, काँक्रिटीकरण आणि रोजच्या जीवनातील केमिकलचा जास्त वापर. अॅलर्जी कोणत्याही वयात होऊ शकते, पण जास्त प्रमाणात छोट्या मुलांमध्ये होते. कारण लहान मुलांमध्ये शरीराचा विकास पूर्णपणे झालेला नसतो. जसजसे वय वाढते, डोळ्यांमधील शक्ती वाढते आणि डोळ्यांत अॅलर्जीचे प्रमाण कमी होते.

लहान मुलांमध्ये होणारी अॅलर्जी :

लहान मुलांमध्ये होणारी अॅलर्जी जास्त प्रमाणात 'वर्नल' प्रकारची असते. मुलांमध्ये डोळ्याला खाज येण्याचे प्रमाण खूपच जास्त असते आणि मुले डोळ्याला जोरजोरात चोळतात. डोळ्यांतल्या बुब्बुळाजवळ छोटे फोड येतात. डोळ्यांचा रंग मातीसारखा होतो. लाली येते आणि डोळे उघडायला त्रास होतो. एरवी डोळ्यांच्या नजरेवर काही दुष्परिणाम होत नाही; पण कधीतरी नंबर येऊ शकतो आणि डोळ्यांत जखमसुद्धा होऊ शकते. योग्य उपचार करणे आवश्यक आहे. पण चांगली गोष्ट अशी, की अॅलर्जी मुलांमध्ये १२-१३ वर्षापर्यंत आपोआप कमी होते.

अॅलर्जीवर उपचार :

अॅलर्जीचे मूळ कारण म्हणजे डोळ्यांत असलेल्या वेगवेगळ्या केमिकलच्या संग्रहाचे प्रमाण. हा केमिकल संग्रह कमी झाल्यामुळे अॅलर्जीचे प्रमाण वाढते. औषध उपचाराने केमिकलचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करून अॅलर्जीची लक्षणे कमी होतात. डोळे थंड ठेवल्यावर खाज कमी होते. बऱ्याचदा स्टेरॉईडयुक्त औषधाचा वापर केला जातो. त्याशिवाय ओलोपाटिडीन आणि इतर औषधांमुळे केमिकलचे प्रमाण कमी करून अॅलर्जीची लक्षणे कमी होतात. स्टीरॉयडच्या अनियमित वापरामुळे डोळ्यांत काचबिंदू आणि मोतिबिंद होऊ शकतो. सवव डोळ्यांच्या अॅलर्जीसाठी नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news