वॉशिंग्टन : अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील सायन्स डायरेक्टर एममिलियाना सिमोन थॉमस यांनी कोणकोणत्या कारणांनी माणसाला आनंद मिळतो हे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांना मोठा पगार किंवा करिअरमधील यश हे आनंदाचे कारण असल्याचे वाटते; पण ते खरे नाही.
स्वतःसाठी काही खरेदी करीत राहण्यापेक्षा इतरांसाठी पैसे खर्च केल्याने आनंद मिळतो. मोठा प्रवास करण्यापेक्षा मित्रांसमवेत जेवण केल्यानेही आनंद मिळतो. अनोळखी लोकांशी बातचित केल्यानेही माणसाला आनंद मिळतो, असे थॉमस यांनी म्हटले आहे. मोठ्या शहरांतील जीवन ताणतणावाचे असते. त्यामुळे छोट्या शहरांतील किंवा खेड्यांमधील जीवनात खरा आनंद मिळतो, असेही त्यांनी म्हटले आहे.