पुढारी वृत्तसेवा
लठ्ठपणा हा केवळ आजार नसून तो आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. आपल्या काही रोजच्या सवयी नकळत शरीरातील चरबी वाढवण्यास मदत करतात.
सकाळचा नाश्ता न केल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडते. यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होऊन वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो. नाश्ता टाळू नका.
रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीराचे 'बायोलॉजिकल क्लॉक' बिघडते. यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि चरबी साठू लागते. उशिरा जेवण करणे टाळा.
व्यायामाचा अभाव आणि तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने शरीरातील कॅलरीज जाळल्या जात नाहीत, परिणामी लठ्ठपणा वाढतो.
मोबाईल किंवा टीव्हीसमोर जास्त वेळ घालवल्याने शरीराची हालचाल कमी होते. संशोधनानुसार, यामुळे चयापचय क्रियेत अडथळा निर्माण होतो.
कोल्ड ड्रिंक्स किंवा साखरयुक्त पेयांमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते. ही पेये लहान मुले आणि मोठ्यांमध्येही लठ्ठपणा वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अशी पेये टाळा.
अपुर्या झोपेमुळे भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. यामुळे आपण वारंवार 'स्नॅकिंग' करतो, जे वजनावर नियंत्रण ठेवू देत नाही.
बाहेरील पाकीटबंद किंवा अति-प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने अतिसेवन होते. या पदार्थांमुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते. पाकीटबंद खाणे आजपासूनच बंद करा.