Eye Care: नैनो की सुणियो रे! डोळे सांगणार ह्रदयाचे आरोग्य अन् तुम्ही किती लवकर म्हातारे व्हाल, नवीन संशोधन समोर
एका साध्या डोळ्याच्या तपासणीतून (Eye Scan) तुमच्या हृदयाचे आरोग्य कसे आहे, हे तर कळेलच, पण तुम्ही तुमच्या वयापेक्षा किती लवकर वृद्ध (म्हातारे) होत आहात, हे देखील आता समजू शकणार आहे. कॅनडामध्ये झालेल्या एका नवीन संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
अभ्यास काय सांगतो?
संशोधकांनी शोधले आहे की, तुमच्या डोळ्यांमधील लहान रक्तवाहिन्यांची तपासणी, ज्याला 'रेटिना स्कॅन' (Retinal Scan) म्हणतात, ती तुमच्या संपूर्ण रक्तवाहिन्यांचे आरोग्य (Vascular Health) आणि तुमचे शरीर नैसर्गिकरित्या किती वेगाने वृद्ध होत आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकते.
संशोधक डॉ. मेरी पिगेरे सांगतात की, डोळा शरीरातील रक्त प्रवाहाचे एक खास आणि सहज पाहता येणारे दृश्य आहे. या लहान रक्तवाहिन्यांमध्ये होणारे बदल संपूर्ण शरीरात काय घडत आहे, हे दर्शवतात.
अभ्यासातील मुख् निष्कर्ष काय?
या संशोधनात ७४ हजारांहून अधिक लोकांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यात आढळले आहे की, ज्या लोकांच्या डोळ्यांमधील रक्तवाहिन्या साध्या (सरळ) आणि कमी फांद्या असलेल्या होत्या, त्यांना हृदयविकाराचा (Heart Disease) धोका जास्त होता. तसेच, अशा लोकांमध्ये लवकर वृद्धत्वाची चिन्हे दिसत होती, जसे की शरीरातील वाढलेला दाह/सूज (Inflammation) आणि कमी अपेक्षित आयुष्य (Shorter Lifespan).
भविष्यात काय होऊ शकते?
सध्या हृदयविकार, स्ट्रोक किंवा विस्मरण (Dementia) यांसारख्या आजारांसाठी अनेक किचकट चाचण्या कराव्या लागतात. पण, या संशोधनामुळे एक आशा निर्माण झाली आहे की, भविष्यात केवळ एक साधा रेटिना स्कॅन वृद्धत्व आणि हृदयविकाराचा धोका या दोन्हीबद्दल जलद आणि सोपी माहिती देऊ शकेल.
वृद्धत्व अन् हृदयविकारासाठी शोधली 'ही' प्रथिने (Proteins)
या टीमने दोन विशेष प्रथिने (MMP12 आणि IgG-Fc receptor IIb) देखील शोधली आहेत, जी रक्तवाहिन्यांचे लवकर वृद्धत्व आणि सूज/दाह यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भविष्यात ही प्रथिने लक्ष्य करून, रक्तवाहिन्यांचे वृद्धत्व कमी करणारी आणि हृदयविकार दूर ठेवणारी औषधे विकसित करता येतील.
डोळे खऱ्या अर्थाने आपल्या शरीराची खिडकी; संशोधनातून स्पष्ट
हे नवीन संशोधन असे सिद्ध करते की, डोळे खऱ्या अर्थाने आपल्या शरीराची खिडकी आहेत. अधिक संशोधन झाल्यास, एक साधा, वेदनारहित (पीडा न देणारा) डोळ्याचा स्कॅन भविष्यात हृदयविकार आणि इतर आरोग्य समस्या लवकर ओळखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक साधन (Preventive Tool) बनू शकेल.

