

दिवसभराच्या धावपळीनंतर सायंकाळच्या वेळेला काहीतरी खावंसं वाटणं हे अनेकांच्या दिनक्रमाचा भाग झालं आहे. पण हा खाण्याचा मोह खरंच भुकेमुळे असतो का?, की फक्त सवयीने? हा प्रश्न सध्या आरोग्यविषयक चर्चेत केंद्रस्थानी आहे. त्यामुळे संध्याकाळी स्नॅक्स : भूक की सवय?, हे योग्य की अयोग्य याविषयी तज्ज्ञ काय सांगतात ते सविस्तर जाणून घेऊया
दिवसभराच्या कामानंतर मेंदूला dopamine या आनंददायक रसायनाची गरज वाढते. त्यामुळे गोड, तिखट किंवा कुरकुरीत पदार्थांची ओढ निर्माण होते. ऑफिस किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे संध्याकाळी comfort food हवं वाटतं. हे केवळ भूक नाही, तर मानसिक समाधानासाठी असू शकतं. मोबाईलवर स्क्रोलिंग करताना आपण नकळत खाण्याकडे वळतो, आणि पोट खरंच रिकामं आहे का, हे लक्षात राहत नाही.
संध्याकाळी शरीराचा circadian rhythm बदलतो, त्यामुळे पचनक्रिया संथ होते. यावेळी शरीर साखरेवर नीट प्रक्रिया करू शकत नाही, त्यामुळे गोड किंवा मैद्याचे पदार्थ जास्त हानीकारक ठरतात. सतत munching केल्याने leptin (पोट भरल्याचा सिग्नल देणारे हार्मोन) गोंधळते, त्यामुळे खाण्याची सवय वाढते. वारंवार खाल्ल्याने bloating, acidity, वजन वाढ, आणि काही वेळा झोपेवरही परिणाम होऊ शकतो.
खरंच भूक आहे का, तपासा: खाण्याआधी स्वतःला विचारा – "मला खरंच भूक लागली आहे का?"
२० मिनिट थांबा, पाणी प्या: कधीकधी तहान आणि भूक यात गोंधळ होतो.
आरोग्यदायी पर्याय निवडा: सूप, मूठभर शेंगदाणे, फळं, ताक हे चांगले पर्याय आहेत.
चहा+फरसाण रोज नको: हे कॉम्बिनेशन रोज घेणं टाळा, कारण त्यात कॅलरीज आणि साखर जास्त असते.
निरोगी व्यक्तींसाठी: हलका नाश्ता चालू शकतो.
आरोग्याच्या समस्या असणाऱ्यांसाठी: acidity, diabetes, PCOS, thyroid, fatty liver, insomnia असणाऱ्यांनी संध्याकाळी स्नॅक्स टाळणं जास्त फायदेशीर ठरू शकतं.
भूक असेल तेव्हाच खा. सवयीने खाणं हे शरीराच्या नैसर्गिक लयेला बिघडवू शकतं. सायंकाळी खाण्याची सवय बदलली, तर आरोग्य सुधारू शकतं हा बदल आजपासूनच सुरू करा!