Viral News: हनुमान चालीसा ऐकताच ५ सेकंदांत बाळ शांत होते; चिनी उद्योजिकेने सांगितली मुलांच्या संगोपनाची अनोखी पद्धत

लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका चिनी उद्योजिकेने आपल्या चार महिन्यांच्या मुलाला शांत करण्यासाठी अनोखा मार्ग शोधल्याचा दावा केला आहे.
Chinese entrepreneur Sara Jane Ho
Chinese entrepreneur Sara Jane HoFile Photo
Published on: 
Updated on: 

Viral News Hanuman Chalisa

लॉस एंजेलिस : बाळ रडू लागल्यानंतर त्याला शांत करण्यासाठी आई-वडील अनेक उपाय करतात. अंगाई गीतापासून ते बाळाला कडेवर घेऊन घरभर फेरफटका मारण्यापर्यंत अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका चिनी उद्योजिकेने आपल्या चार महिन्यांच्या मुलाला शांत करण्यासाठी अनोखा मार्ग शोधल्याचा दावा केला आहे. ‘हनुमान चालिसा’ ऐकवल्यानंतर आपला मुलगा अवघ्या पाच सेकंदांत शांत होतो, असे ४० वर्षीय उद्योजिका सारा जेन हो हिने म्हटले आहे.

चाळिशीत आई झाल्यानंतरचा अनुभव सांगताना साराने सांगितले की, बर्निंग मॅन महोत्सवात तिची काही भारतीय मित्रांशी ओळख झाली. त्यांच्याकडून तिला हनुमान चालिसेबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तिने हा प्रयोग आपल्या मुलावर करून पाहिला. आता जेव्हा तिचे बाळ चिडते किंवा रडते, तेव्हा ती हनुमान चालिसा लावते. तिच्या म्हणण्यानुसार, अवघ्या पाच सेकंदांत मुलगा शांत होतो आणि सुमारे दोन मिनिटांत गाढ झोपी जातो.

“जेव्हा माझा मुलगा चिडतो किंवा रडतो, तेव्हा हनुमान चालिसा लावताच तो पाच सेकंदांत शांत होतो आणि दोन मिनिटांत गाढ झोपतो,” असा दावा साराने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये केला आहे. ती आता दररोज सकाळी नियमितपणे हनुमान चालिसा ऐकवते.

Chinese entrepreneur Sara Jane Ho
Newborn preferences study: जन्मापासूनच मुला-मुलींच्या आवडी वेगळ्या असतात; असं का? अभ्यासात मोठा खुलासा

सरोगेट आईच्या दुधावर वाढतोय मुलगा

साराने आपल्या मुलाच्या आहाराबाबतही माहिती दिली आहे. ‘बेबी जे’ हा सरोगेट आईच्या दुधावर वाढत असल्याचे तिने सांगितले. भविष्यात त्याला काही खाद्यपदार्थांची अॅलर्जी होऊ नये, यासाठी ती सरोगेट आईला शेंगदाणे आणि सोया दूध पाठवते. सुरुवातीपासूनच त्याची शरीराला सवय व्हावी, असा तिचा यामागील उद्देश असल्याचे ती सांगते.

माती, दगड आणि गवतावर अनवाणी चालण्याचा सराव

बेबी जेच्या दिनचर्येत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यालाही महत्त्व दिले जाते. सारा आपल्या मुलाला बागेतील माती, दगड आणि गवताचा अनवाणी पायांनी स्पर्श करू देते. या पद्धतीला ती ‘ग्राउंडिंग’ म्हणते. लहान मुलांच्या पायांच्या तळव्यांमध्ये अनेक मज्जातंतू असतात आणि या सरावामुळे मज्जासंस्था व शारीरिक विकासाला फायदा होतो, असा तिचा विश्वास आहे.

बाळाला रडू देऊन ते स्वतःहून शांत होऊ देण्याच्या ‘क्राय इट आऊट’ पद्धतीवर साराचा विश्वास नाही. “पहिल्या नऊ महिन्यांत बाळाला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व समजत नाही. त्यामुळे माझे बाळ जेव्हा रडते, तेव्हा मी त्याला लगेच उचलून घेते,” असे ती म्हणते. इन्स्टाग्राम पोस्टच्या शेवटी साराने इतर पालकांकडूनही चार महिन्यांच्या बाळाच्या संगोपनासाठी काही नव्या टिप्स मागितल्या आहेत.

Chinese entrepreneur Sara Jane Ho
Problem of Dyscalculia | समस्या गणितीय अक्षमतेची

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news