Chia Seeds Benefits | चिया सीड्स आहेत आरोग्याचा खजिना, बीपी-शुगरसारख्या अनेक आजारांना ठेवतात कंट्रोलमध्ये

Chia Seeds Benefits | नियमित चिया सीड्स खाल्ल्याने हृदय, मेंदू, पचन यासोबतच डायबिटीज आणि कॅन्सरपासूनही संरक्षण मिळू शकतं.
Chia Seeds
Chia SeedsCanva
Published on
Updated on

Chia Seeds Benefits

आपल्या आहारात अनेक प्रकारचे बीजं (Seeds) असतात, जसं की भोपळ्याचं बी, त्याचबरोबर चिया सीड्स (Chia Seeds) हे देखील खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. दिसायला अगदी बारीक-छोटे असले तरी या बीजांमध्ये पोषणद्रव्यांचा मोठा खजिना लपलेला आहे. नियमित चिया सीड्स खाल्ल्याने हृदय, मेंदू, पचन यासोबतच डायबिटीज आणि कॅन्सरपासूनही संरक्षण मिळू शकतं.

Chia Seeds
Allergic Rhinitis | समस्या अ‍ॅलर्जिक र्‍हायनायटिसची

चिया सीड्समध्ये काय असतं?

  • अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननं दिलेल्या माहितीनुसार, चिया सीड्सचं शास्त्रीय नाव Salvia Hispanica आहे.

  • या बियांमध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स, प्रोटीन, जीवनसत्वं, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.

  • हे सर्व घटक शरीराला मजबूत ठेवतात आणि रोगांपासून लढायला मदत करतात.

चिया सीड्स खाण्याचे फायदे

हृदयासाठी फायदेशीर

  • यात असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स रक्तातील वाईट कॉलस्टेरॉल कमी करतात आणि चांगलं कॉलस्टेरॉल वाढवतात.

  • बीपी (Blood Pressure) नियंत्रित ठेवतात आणि हृदयाची गती सामान्य राहते.

  • रक्त गाठी होणं (Blood Clotting) कमी होतं, त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका घटतो.

  • ज्यांना बीपी किंवा हृदयाचे आजार आहेत आणि औषधं चालू आहेत, त्यांनी आहारात चिया सीड्स नक्की समाविष्ट करावेत.

डायबिटीजवर नियंत्रण

  • चिया सीड्समधला फायबर शरीरात साखरेचं शोषण हळूहळू होऊ देतो.

  • त्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत किंवा कमी होत नाही.

  • इन्सुलिन रेसिस्टन्स कमी होतं आणि टाईप-2 डायबिटीजचा धोका घटतो.

Chia Seeds
Pomegranate Acidity Benefits| पित्तासाठी डाळींब कसे ठरते फायदेशीर?

पचन सुधारतं

  • ज्यांना गॅस, अपचन, पोट फुगणं किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी चिया सीड्स औषधासारखे काम करतात.

  • पाण्यात भिजवल्यावर हे बी जेलसारखं होतं आणि आतड्यांची सफाई करतं.

  • पचनक्रिया सुधारते आणि पोट हलकं वाटतं.

कॅन्सरपासून संरक्षण

  • चिया सीड्समधले अँटीऑक्सिडंट्स शरीरातले फ्री रॅडिकल्स कमी करतात.

  • हे फ्री रॅडिकल्स म्हणजेच कॅन्सरचं मूळ कारण मानलं जातं.

  • यामुळे शरीराच्या पेशी सुरक्षित राहतात आणि सूज (Inflammation) कमी होते.

  • काही संशोधनात दिसून आलंय की ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स ट्यूमरची वाढ थोपवतात.

चिया सीड्स कसे खावे?

  • दही, दूध, ज्यूस किंवा पाण्यात भिजवून खा.

  • सॅलड, ओट्स किंवा स्मूदी मध्ये टाकून खाता येतात.

  • थोडं हलकं भाजून खाल्लं तरी चालतं.

  • मात्र, कोरडे चिया सीड्स जास्त प्रमाणात खाऊ नयेत, कारण ते पोटात जाऊन फुगतात आणि त्रास होऊ शकतो.

थोडक्यात, चिया सीड्स योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास बीपी, शुगर, कॉलस्टेरॉल यावर नियंत्रण ठेवून तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news