लहान मुलांच्या वजनवाढीसाठी ‘हे’ पदार्थ ठरतीय फायदेशीर

लहान मुलांच्या वजनवाढीसाठी ‘हे’ पदार्थ ठरतीय फायदेशीर
Published on
Updated on

बाळाचा जन्म झाल्यापासून मुलांचे वजन कसे वाढेल, यासाठी आईबाबा प्रयत्न करत असतात. काही जण काळजीत असतात. डॉक्टरांनी दिलेल्या वजनाच्या तक्त्याशी बाळांचे वजन वाढले नसल्यास नवे आईबाबांची चिंता अधिक वाढते.

वास्तविक, बाळाचे वजन वयापेक्षा कमी असले तरी बाळ जर योग्य पद्धतीने खात-पित असेल आणि खेळकर असेल तर घाबरण्याचे कारण नाही. पण, पालक मात्र बाळांचे वजन वाढावे यासाठी लहान वयातच अनारोग्यकारी पदार्थ खाण्याच्या सवयी लावतात. बाळाच्या वजन वाढीसाठी उच्च उष्मांक असलेले पदार्थ खायला घालणेही गरजेचे आहे.

केळे : लहान मुलांना केळी आवडतेच. केळ खाल्ल्याने व्यक्तीला ताबडतोब ऊर्जा मिळते. तसेच मुलांना केळ्याची चवही आवडते. केळ्यात कार्बोहायड्रेटस, पोटॅशिअम, तंतुमय पदार्थ तसेच सी आणि बी 6 ही जीवनसत्त्वेही भरपूर प्रमाणात असतात. तथापि, कफाचा, सर्दीचा त्रास असल्यास केळे देऊ नये.

शुद्ध साजूक तूप : देशी शुद्ध साजूक तुपात अनेक प्रकाराचे पोषक गुण असतात. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास मदत होते. तसेच त्यांची ताकद वाढते. 8 महिन्यांनतर बाळाचे जेवण करताना त्यात तुपाचा वापर करावा. आपल्या मुलांना खिचडी, तांदूळ, दलिया आदी पदार्थ खायला घालताना त्यात साजूक तूप घालावे. तसेच बाळांना पोळी खायला घालतानाही साजूक तूप घालून खायला घालावे.

सायीचे दही : कॅल्शिअम, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी संपृक्त असलेले सायीचे दही मुलांचे वजन वाढण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे वजन वाढण्यासाठी हा आरोग्यकारी पर्याय आहे. लहान मुलांसाठी गरजेच्या कॅलरीज आणि चरबी त्यात असतात. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते.

बटाटा : लहान मुलांना उकडलेला बटाटाही आवडतो. त्यात भरपूर कार्बोहायड्रेटस असतात. त्यात सी जीवनसत्त्व, बी 6 जीवनसत्त्व आणि मॅगनीज आणि फॉस्फोरससुद्धा असते.

अंडे : अंड्यात प्रथिने, मेद, खनिजे आणि ए तसेच बी 12 जीवनसत्त्व असतात. लहान मुलांच्या वाढीसाठी अंडे खायला घालावे. मूल एक वर्षाचेे झाल्यावर अंड्यातील पिवळा भाग सुरुवातील खायला घालू शकता.

लोणी : लोण्यामध्ये भरपूर प्रमाणात चरबी असते. बाळांना चरबीची गरजही असते. त्यामुळे बाळांचे वजनही झटपट वाढते. पोळीला लोणी लावून किंवा ब्रेड वर लोणी लावून खायला दिली जाऊ शकते.

सुका मेवा :  लहान मुलांच्या आहारात सुकामेव्याचा समावेश आवर्जून करा. बदाम, काजू, अक्रोड, किसमिस, पिस्ता, खजूर-खारीक हा सर्व सुकामेवा वाटून खायला घालू शकतो. त्यामुळे मुलांना पोषकतत्त्वही मिळतात व वजनही वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news