तरुणांनो सावधान..! गरम पाण्‍याने आंघोळीचा शुक्रांणूवर होतो परिणाम,जाणून घ्‍या नवीन संशोधन | पुढारी

तरुणांनो सावधान..! गरम पाण्‍याने आंघोळीचा शुक्रांणूवर होतो परिणाम,जाणून घ्‍या नवीन संशोधन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍याकडे आंघोळ म्‍हटलं की, गरम पाणी हे समीकरण ठरलेल. मात्र हे समीकरण तरुणांसाठी घातक ठरु शकते. कारण गरम पाण्‍याने आंघाेळ हे तरुणांच्‍या शुक्रांणूमध्‍ये (स्‍पर्म) घट  करत असल्‍याचे नवीन संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे. ( Hot Water Baths Can Reduce Fertility, Sperm Count) जाणून घेवूया कॅलिफोर्निया विद्यापीठातील नवीन संशोधनाविषयी…

Hot Water Baths : असे झाले संशोधन?

कॅलिफोर्निया विद्यापीठातील यूरोलॉजिस्ट टीमने (मूत्रविकार तज्ञ) नियमितपणे गरम बाथटब किंवा गरम पाणे आंघोळीची सवय असलेल्या पुरुषांच्या गटावर अभ्यास केला. त्‍यांना आठवड्यातून किमान 30 मिनिटे गरम पाण्याच्या संपर्कातील ठेवण्‍यात आला. यानंतर संबंधित पुरुषांच्‍या वीर्याचे नमुने तपासले गेले. संशोधकांना आढळले की, उष्णतेच्या कमी संपर्कात असलेल्या लोकांच्या तुलनेत गरम पाण्‍याच्‍या संपर्कात असलेले शुक्राणूच्‍या गतीशीलतेमध्‍ये घट झाली होती.( Hot Water Baths Can Reduce Fertility, Sperm Count)

संशोधकांनी काढलेला निष्‍कर्ष

या संशोधनात युरोलॉसिस्‍ट टीमने निष्‍कर्ष काढला की, गरम पाण्‍याने केलेल्‍या आंघोळीच्‍यावेळी अंडकोष जास्‍त गरम होऊ शकतात, शुक्राणूंची गतिशीलता आणि संख्या कमी होऊ शकते. गरम पाण्‍यामुळे निर्माण झालेल्‍या उष्णतेमुळे शुक्राणूंची डीएनए अखंडता आणि गुणवत्ता देखील खराब होऊ शकते. याबाबत यापूर्वी झालेल्‍या संशोधनांमध्‍ये याच प्रकारचे निष्‍कर्ष काढण्‍यात आले होते. वाढत्या उष्णतेमुळे पुरुषाच्‍या डीएनए अखंडता आणि एकूण शुक्राणूंच्या गुणवत्ता कमी होते. यामुळे यामुळे कोणत्याही गर्भधारणा झालेल्या संततीमध्ये जन्म दोष आणि अनुवांशिक विकृती होण्याची शक्यता वाढते. ( Hot Water Baths Can Reduce Fertility, Sperm Count)

तज्ञांच्या मते, वंध्यत्व हा जगभरातील मोठी समस्‍या होत आहे. दर सहा जोडप्यांपैकी एकाला वंध्‍यत्‍वाला सामोरे जावे लागत आहे. संशोधकांच्‍यामध्‍ये प्रत्येक तीनपैकी एक प्रकरण केवळ पुरुष जोडीदाराच्या प्रजनन समस्यांमुळे वंध्‍यत्‍व ही समस्‍या जाणवते. पुरुषांमधील वंध्यत्व हे शुक्राणूंची निर्मिती,संख्या, आकार आणि त्याची गतीशीलता यासह अनेक गोष्टींशी संबंधित आहे. ( Hot Water Baths Can Reduce Fertility, Sperm Count )

वंध्‍यत्‍व टाळण्‍यासाठी हे उपाय करा

नियमित व्‍यायाम : तुमच्या एकूण आरोग्यासाठी उत्तम नियमित व्‍यायाम आवश्‍यक आहे. यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते आणि प्रजनन क्षमता सुधारते.जे पुरुष नियमित व्यायाम करतात त्यांच्यात टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असते आणि वीर्य गुणवत्ता व्‍यायामाचा अभाव असणार्‍या पुरुषांपेक्षा चांगली असते, असे यापूर्वीच्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झालेले आहे.

संतुलित आहार : व्हिटॅमिन सी केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत नाही तर ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते. तसेच आहारात झिंक हे एक आवश्यक खनिज आहे जे मांस, मासे, अंडी आणि शेलफिश यासारख्या विविध प्राण्यांच्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. पुरेशा प्रमाणात झिंक मिळणे हा पुरुष प्रजनन क्षमतेचा एक पाया मानला जातो.

तणाव टाळा : ताणतणावाचा मोठा परिणाम लैंगिक संबंधांवर होतो. तज्ञांच्या मते, तणावामुळे लैंगिक समाधान मोठ्या प्रमाणात कमी होते आणि तुमची प्रजनन क्षमता बिघडू शकते. दीर्घकाळापर्यंत तणावामुळे कोर्टिसोल हार्मोन (संप्रेरक) पातळी वाढते. याचा टेस्टोस्टेरॉनवर नकारात्मक प्रभाव पडतो.

वजन कमी ठेवा : तज्ञांच्या मते, अतिरिक्त वजन वंध्यत्वाशी संबंधित आहे आणि आपण आकारात असणे आवश्यक आहे.
व्‍यसनापासून लांब रहा : अति मद्यपान टाळा, यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते आणि वीर्य गुणवत्ता खराब होऊ शकते.

हेही वाचा : 

 

Back to top button