Kotak-GetSetUp : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी कोटकची गेटसेटअपसोबत भागीदारी | पुढारी

Kotak-GetSetUp : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी कोटकची गेटसेटअपसोबत भागीदारी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (‘केएमबीएल’/कोटक) कोटक ग्रॅण्‍ड सेव्हिंग्‍ज प्रोग्रामसह ज्‍येष्‍ठ नागरिकांना विविध आरोग्‍य व वेलनेस अनुभव देण्‍यासाठी पीअर-टू-पीअर प्‍लॅटफॉर्म गेटसेटअपसोबत सहयोग केला आहे. या उपक्रमांतर्गत ज्‍येष्‍ठ नागरिकांना आरोग्‍य, पोषण, वेलनेस इत्‍यादींमधील हजारो क्‍लासेस, इव्‍हेण्‍ट्स व अनुभव विशेष उपलब्‍ध होतील आणि या प्रक्रियेत समुदायाचा भाग बनतील, तसेच त्‍यांच्‍या सदस्‍यत्‍वाचा भाग म्हणून ख-या संबंधांना चालना मिळेल. Kotak-GetSetUp

नॅशनल स्‍टॅटिस्टिकल ऑफिस (एनएसओ)च्‍या एल्‍डर्ली इन इंडिया २०२१ अहवालानुसार भारतातील वृद्ध व्‍यक्‍तींची संख्‍या (६० वर्ष व त्‍यापेक्षा अधिक वय) दशकभरात ४१ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह २०२१ मधील १३८ दशलक्षवरून २०३१ मध्‍ये १९४ दशलक्षपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. गेटसेटअप सदस्‍यत्‍वासह कोटक ग्रॅण्‍डचे ग्राहक इंटरअॅक्टिव्‍ह व सर्वसमावेशक क्‍लासेसच्‍या माध्‍यमातून आयोजित करण्‍यात येणाऱ्या आजीवन शिकण्‍याच्‍या विविध अनुभवांचा आनंद घेऊ शकतात. मुंबई, पुणे व अहमदाबाद येथे सुरूवातीला पायलट प्रोग्राम म्‍हणून लाँच करण्‍यात आलेला हा उपक्रम गेटसेटअप व्‍यासपीठावरील मोफत सदस्‍यत्‍वाच्‍या माध्‍यमातून भारतभरात कोटक ग्रॅण्‍डच्‍या ग्राहकांपर्यंत विस्‍तारित करण्‍यात येईल. Kotak-GetSetUp

कोटक महिंद्रा बँकेच्‍या रिटेल लाय‍बिलिटीजचे अध्‍यक्ष व वितरण प्रमुख पुनीत कपूर म्‍हणाले, ”आमची ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या आरोग्‍यावर लक्ष केंद्रित करत त्‍यांना प्रशंसित करण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. गेटसेटअपसोबत सहयोग करत आम्‍ही कोटक ग्रॅण्‍ड ग्राहकांना आरोग्‍यदायी व समाधानकारक जीवन जगण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी सामाजिक सहभाग उपक्रम राबवत आहोत.”

गेटसेटअपच्‍या बिझनेस डेव्‍हलपमेंट अॅण्‍ड पार्टनरशीप्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अश्विनी कपिला म्‍हणाले, ”५५ वर्ष व त्‍यावरील वयोगटातील ज्‍येष्‍ठ नागरिकांना सक्षम करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले समुदाय व्‍यासपीठ गेटसेटप संसाधनांचा खजिना आहे, जो त्‍यांच्‍या इंटरअॅक्टिव्‍ह, वैयक्तिकृत कोर्सेस व अनुभवांच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारतो. हा सहयोग कोटक ग्रॅण्‍ड सेव्हिंग्‍ज प्रोग्रामच्‍या ग्राहकांना अनेक संपन्‍न अनुभव आणि कौशल्‍य निर्माण करण्‍याच्‍या संधी देईल.”

कोटक ग्रॅण्‍ड सेव्हिंग्‍ज प्रोग्राम ५५ वर्ष व त्‍यावरील वयोगटातील ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा प्रोग्राम अनेक ऑफरिंग्‍ज देतो, जसे शाखांमध्‍ये प्रायोरिटी सर्विस, होम-बँकिंग सुविधा, कोटक रिवॉर्डस्, लॉकर रेण्‍टल्‍सवर सूट, ओव्‍हरड्राफ्ट सुविधा, हेल्‍थकेअर फायदे आणि इतर अनेक. कलिनरी अॅडवेन्‍चर्सपासून आर्ट सेमिनार्सपर्यंत आणि वेलनेस क्‍लासेसपासून उत्‍साहवर्धक एक्‍सरसाइजपर्यंत कोटक ग्रॅण्‍ड ग्राहक आता स्‍वयंशोधाचा व कौशल्‍य वाढीचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या वैयक्तिक विकासाला चालना मिळण्‍यासह जीवनाचा दर्जा सुधारेल.

हेही वाचा 

Back to top button