डोळ्यांत लाल डाग दिसत असल्यास… | पुढारी

डोळ्यांत लाल डाग दिसत असल्यास...

डॉ. मनोज शिंगाडे : शरीराचा खूप महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे डोळा. कारण, अत्यंत नाजूक पेशींपासून डोळा तयार होत असतो. त्यामुळे निष्काळजीपणा केल्यास डोळ्यांशी निगडीत मोठा आणि गंभीर आजार होऊ शकतो.

अनेकदा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये डाग दिसतात. डोळ्यांतील हे डाग मॅक्युलर डिजनरेशन होण्यास कारणीभूत ठरू शकतो. हा एक धोकादायक रोग आहे. कारण, त्यामध्ये दृष्टी जाऊन व्यक्ती अंधही होऊ शकते. हा आजार नेमका काय आणि त्यापासून कसा बचाव करता येईल, हे पाहूया!

मॅक्युलर डिजनरेशन

डोळ्यांत डाग पडणे हा त्रास मॅकुलामुळे होतो. हा रेटिनाच्या केंद्रस्थानी असते. मॅकुला बुबुळाच्या आत मागच्या बाजूला असलेल्या उतींचा हा एक थर असतो. सामान्यपणे ५० वर्षांच्या वयापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. हा आजार दोन प्रकारांत दिसतो. एक ओलसर डाग असणारा आणि दुसरा सुके डाग असणारा.

कारणे

सर्वसाधारणपणे पन्नाशीनंतरच्या लोकांमध्ये हा विकार असल्याचे पाहायला मिळते. ६० ६५ वर्षे वयाच्या दरम्यान ही समस्या सामान्यपणे दिसते. एखाद्या व्यक्तीच्या घरी अनुवांशिक समस्या असेल तर पुढच्या पिढीला ही समस्या भेडसावण्याची शंका असू शकते. ज्या व्यक्तींना धूम्रपानाची सवय असेल किंवा धूम्रपानाच्या धुरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीलाही मॅक्युलर डिजनरेशन होण्याची शंका वाढते.

स्थलतेमुळे म्हातारपणी व्यक्तीला मॅक्युलर डिजनरेशनची समस्या होते. हृदयाशी निगडीत आजारांतही मॅक्युलर डिजनरेशन होण्याची शंका जास्त असते. आजार वाढल्यास व्यक्तीला तणाव आणि स्मृतिभ्रंशसारख्या समस्या होऊ शकतात. मॅक्युलर डिजनरेशनची सुरुवात ड्राय मॅक्युलर डिजनरेशनने होते आणि मग त्यात वाढ होत ओलसर स्वरूपाच्या मॅक्युलर डिजनरेशनमध्ये परावर्तित होऊ शकतो. त्यामुळे वेळीच याची तपासणी करणे आणि त्याची वाढ रोखणे आवश्यक आहे.

बचाव कसा करायचा?

डोळ्यात डाग होण्याची समस्या असेल तर सुरुवातीपासून ते वाढण्यापासून बचाव करण्यासाठी काही सोप्या सवयी अंगीकाराव्या. या सवयी डोळ्यांच्या रोगांपासून बचाव करतातच शिवाय म्हातारपणात होणाऱ्या अनेक आजारांपासूनही बचाव करतील.

डोळ्यांची नियमित तपासणी करावी. नियमित तपासणीमध्ये या आजाराचा अंदाज येऊ शकतो.

डोळ्यात डाग पडण्यास धूम्रपानही जबाबदार असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना डोळ्यांमध्ये डाग पडण्याचे विकार अधिक होतात. त्यामुळे धूम्रपानापासून बचाव करणे आवश्यक आहे.

़आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या असाव्यात. कोबी, पालक, मटार आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यादेखील असाव्यात. त्यात अँटिऑक्सिडंट असतेच शिवाय ल्युटीनदेखील असते.

आहारात मासळी, सुकामेवा यांचाही समावेश असावा. माशामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे ड्राय मॅक्युलर डिसीज होण्याची शक्यता कमी होते. अक्रोड मध्येही ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे डोळ्यांचे विकार दूर होण्यास मदत होते.

हेही वाचा : 

Back to top button