अ‍ॅनिमिया आणि होमिओपॅथिक उपचार | पुढारी

अ‍ॅनिमिया आणि होमिओपॅथिक उपचार

डॉ. सौ. सपना गांधी

आपल्या देशात मुख्यत्वे स्त्रिया व बालकांमध्ये अ‍ॅनिमिया आजाराचे प्रमाण 80 ते 90 टक्के आहे. बहुतांशी आजारांच्या कारणांमध्ये अ‍ॅनिमिया हे एक कारण असू शकते. अ‍ॅनिमिया म्हणजेच पंडुरोग. अ‍ॅनिमिया या आजाराने शरीराची प्रतिकारशक्‍ती खूपच कमी-कमी होत जाते व त्यामुळे इतर संसर्ग आजार पटकन होतात.

अ‍ॅनिमिया (रक्‍तक्षय) होण्याची कारणे अनेक आहेत. जशी खाण्यापिण्यातून लोहाचे प्रमाण कमी मिळणे. निरनिराळ्या आजारांमध्ये लोह पेशींचे नाश पावणे, बोन मेरो डिस्ट्रक्शन, आपल्या लिव्हरच्या कार्यामध्ये अडथळा किंवा लिव्हरचे आजार, हिरड्यातून रक्‍त जाणे. पोटामध्ये हुकवर्म नावाच्या जंताचे असल्याने ही शरीरातील रक्‍त कमी होते. स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात स्राव होणे, किंवा दर 2-3 आठवड्यात पाळी येणे, प्रेग्‍नंंसी पिरियडमध्ये व डिलिव्हरीनंरचा कालावधी यातही भरपूर प्रमाणात लोह कमतरता येते. दीर्घकालीन आजारांमध्ये मूळव्याध, भगेंद्रच्या तक्रारीमध्ये एचआयव्ही व कॅन्सर सारख्या आजारांतही रक्‍ताच्या प्रमाणात घट होते व अ‍ॅनिमिया होतो. तर कधी अचानक रक्‍तस्राव होणे, उदा. अपघातासारख्या केसेसमध्ये असे होते.

अ‍ॅनिमिया आजाराची लक्षणे सर्वांना परिचित आहेतच. खूप थकल्यासारखे वाटणे, अशक्‍तपणा येणे, थोडे चालले, पळले किंवा जिना चढला तरी धाप लागणे, चक्‍कर आल्यासारखी वाटणे, जास्तवेळ पोट रिकामे असले तरी भोवळ येणे, वारंवार आजारपण येणे, अंगात त्राण नसल्याची भावना, थंडी, ताप असल्यासारखे वाटणे, चेहर्‍यावर उदासिनता, निराशा येणे, नखे व जीभ फिके होणे, डोळे पांढरे होेणे, अस्वस्थ वाटणे, शिवाय रक्‍तक्षयामुळे इतर तक्रारीही लवकर सुरू होतात व सर्वांत महत्त्वाचे लक्षण म्हणजे भूक मंदावणे, खाण्यापिण्याची इच्छाच कमी होणे. उदा कष्टकर्‍यांचे जेवण हे अगदी लहान मुलांसारखे असणे, मातेमध्ये दुधाचे प्रमाण कमी होणे. इ. अनेक लक्षणे सांगता येतील.

प्रथम रक्‍ताची तपासणी करून रक्‍ताचे शरीरात किती प्रमाण आहे हे पाहणे, व त्यानुसार उपचार करणे गरजेचे असते. (ाळश्रव, ोवीरींश व ीर्शींशीश रपरशाळर) अल्प प्रमाणात, मध्यम प्रमाणात व तीव्र स्वरूपात अ‍ॅनिमिया हे तीन प्रकार अ‍ॅनिमियाचे पडतात. ज्याच्या त्याच्या प्रकारानुसार होमिओपॅथिक औषधे वापरता येतात. त्यातील तीव्र स्वरूपाचा अ‍ॅनिमिया असेल तर रक्‍त चढविणे गरजेचे असते. बाकी अल्प व मध्यम प्रकारात होमिओपॅथिक औषधोपचारांनी चांगलाच फायदा मिळतो.

प्रत्येक रुग्णाची वा व्यक्‍तीची शारीरिक व मानसिकता, आहार आवड/निवड, थंड/उष्ण प्रकृती व अनुवंशिकता या सर्वांचाच विचार करून त्याचे पृथक्‍करण करून मुख्य औषधाची निवड केली जाते व त्यामुळे शरीरातील दोष नाहीसे होत-होत आपल्या रक्‍तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढविली जाते. त्यामुळे शरीर अन्‍नपचनाबरोबरच त्या अन्‍नातील पोषक घटक रक्‍तवाहिन्यांमध्ये शोषले जातात. रक्‍ताचे शरीरातील प्रमाण वाढते. शिवाय जोडींनी होमिओपॅथिक रक्‍तवाढीच्या गोळ्याही वापरल्याने चांगलाच फायदा मिळतो, रक्‍त वाढते व रक्‍तातील घटक ही समतोल राहतात.

अ‍ॅनिमिया दूर करणारी काही होमिओपॅथिक औषधे

1) सिंकोना ऑफेंसिनालिस ः- या औषध प्रणालीतील रुग्ण अतिशय अ‍ॅनिमिया युक्‍त असतो. वरचेवर मलेरियासारखे आजार होऊन अ‍ॅनिमिया सुरू होतो. या प्रकारातील रुग्ण कृश व अशक्‍त असतात. त्यांना रक्‍त कमतरतेबरोबरच अपचन, गॅसेसचाही त्रास असतो. थोडे जरी चालले तरी धाप भरते. हे औषध मलेरिया सारख्या आजारात अशक्‍तपणा आल्यावर दिल्यास रक्‍तवाढीत चांगलीच सुधारणा होते.

2) फेरम मेटॅलिकम् ः- फेरममेट हे एक च आहे, जे रक्‍तातील लोह वाढविण्यास उपयोगी ठरते. तरुण व कृश व्यक्‍तींमध्ये रक्‍ताची कमतरता असून हात, पाय थंड पडतात. थोड्याशा कामाने कंटाळा येतो. विशेष म्हणजे जरी रक्‍त कमी असले तरी कातडी पांढरी दिसते व मागोमाग गुलाबी ही दिसते.

3) नॅट्रम मूर ः- ही नॅट्रम मूरचे रुग्णांना मीठ फार प्रिय असते व त्यामुळेच रक्‍ताच्या कार्यामध्ये बिघाड होऊन रक्‍तक्षय व अ‍ॅनिमिया होतो. या प्रकारचे रुग्ण उष्ण प्रकारचे असतात. तरुण वयातील, शाकरी मुले/मुली विनाकारण चिडचिड बनतात. सकाळी अंथरुणातून उठताना अशक्‍तपणा जाणवतो. हळव्या स्वभावाचे रुग्ण असतात. पाळीमध्ये भरपूर रक्‍तस्राव होतो.

4) फॉस्फरस ः- जरी एवढे तेवढे लागले की लगेच रक्‍तस्राव सुरू होतो व खूप प्रमाणात रक्‍त वाहते. रक्‍त पातळ, पाण्यासारखे असते व लवकर गोठतही नाही. यातील रुग्ण थंड प्रकृतीचे असून त्यांना आईस्क्रिम व कोल्ड्रिंक्स भरपूर आवडतात.

5) जिनसेंग ः- हे औषध प्राचीन काळातील राजे लोक वापरत असत. हे औषध दुर्मीळ आहे. जिनसेंगने रक्‍त तर वाढतेच पण भूक ही वाढते. पचनक्रिया सुधारते.

Back to top button