Men's Health: पुरुषांच्या आरोग्यासाठी हे ५ आजार गंभीर धोका ठरू शकतात

असे काही विशिष्ट आजार आहेत जे प्रामुख्याने अशा पुरुषांना होतात जे आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी असतात. अशाच ५ प्रमुख आजारांबद्दल जाणून घ्या.
Health News
Health NewsFile Photo
Published on
Updated on

Men's Health:

नवी दिल्ली: काही आजार असे असतात ज्यांची सुरुवातीची लक्षणे सहजासहजी दिसून येत नाहीत. 'सायलंट किलर'प्रमाणे हे आजार शरीरात हळूहळू मूळ धरतात आणि रुग्णाला त्याची साधी कल्पनाही येत नाही. असे काही विशिष्ट आजार आहेत जे प्रामुख्याने अशा पुरुषांना होतात जे आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी असतात. अशाच ५ प्रमुख आजारांची माहिती आणि त्यावर वेळीच करायच्या उपाययोजनांची माहिती.

१. लठ्ठपणा

आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार २५ kg/m² किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआय असल्यास ती व्यक्ती अतिवजनाच्या श्रेणीत येते. आशियाई देशांमधील नागरिकांमध्ये याचा धोका अधिक असल्याने त्यांचा बीएमआय २३ kg/m² पेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

धोका: लठ्ठपणामुळे हृदयविकार आणि मधुमेहाची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते.

उपाय: शरीराचा बीएमआय मर्यादेत ठेवणे हाच यावरील सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

Health News
Health News: दीर्घायुष्याचा उपाय सापडला! जपानी अभ्यासातून मोठा खुलासा; तुमचीही वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होईल

२. उच्च रक्तदाब

भारतातील तब्बल ४० टक्के पुरुषांना आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे याची कल्पनाच नसते. 'द जर्नल ऑफ हायपरटेंशन'नुसार, भारतात ५७ टक्के मृत्यू स्ट्रोकमुळे तर जवळपास एक तृतीयांश मृत्यू हे हृदयविकारांमुळे होतात.

धोका: कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोक, हार्ट फेल्युअर आणि किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

उपाय: रक्तदाब सामान्य असल्यासही पुरुषांनी वर्षातून किमान एकदा तरी बीपी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

३. मधुमेह

रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे होणारा हा एक दीर्घकालीन आजार आहे. यात शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही. भारतातील ४५ वर्षांवरील दर पाच पुरुषांमागे एक जण मधुमेहाने ग्रस्त आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हे प्रमाण ९.५ टक्क्यांनी अधिक आहे.

धोका: मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास अंधत्व, अवयव निकामी होणे, किडनी फेल्युअर आणि नपुंसकता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

उपाय: वय ४० पेक्षा जास्त असल्यास दर तीन वर्षांनी एकदा 'फास्टिंग ग्लुकोज टेस्ट' अवश्य करावी.

४. हाय कोलेस्ट्रॉल

रक्तातील लिपिडची पातळी अनियंत्रित वाढल्याने ही समस्या निर्माण होते. आयसीएमआरच्या अलिकडील अभ्यासानुसार, शहरातील ८९ टक्के भारतीयांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

धोका: यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका दुपटीने वाढतो.

उपाय: ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी दर तीन वर्षांनी एकदा 'फास्टिंग लिपिड प्रोफाइल' चाचणी करून घ्यावी.

५. मोठ्या आतड्याचा कर्करोग

पुरुषांमध्ये आढळणारा मोठ्या आतड्याचा कर्करोग (कोलन कर्करोग) हा अतिशय सामान्य प्रकार आहे. आशियाई देशांमध्ये याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात.

धोका: वेळीच उपचार न झाल्यास शस्त्रक्रिया करून आतड्याचा मोठा भाग काढून टाकावा लागू शकतो.

उपाय: इतर कर्करोगांप्रमाणेच कोलन कर्करोगाचे वेळेत निदान होण्यासाठी नियमित तपासणी महत्त्वाची आहे. यामुळे आतील गाठी किंवा 'पॉलिप्स'चा आकार वाढण्यापूर्वीच त्यावर उपचार करणे शक्य होते.

Health News
LDL Cholesterol: खराब कोलेस्ट्रॉलमुळे कमी होतंय आयुष्य; भारत अन् चीनमध्येच जगातील ३३% प्रमाण, पाहा संशोधनातील धक्कादायक माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news