होय! आपण क्षयरोग संपवू शकतो! | पुढारी

होय! आपण क्षयरोग संपवू शकतो!

उद्या 24 मार्च. हा दिवस ‘जागतिक क्षयरोग दिन’ म्हणून सर्वत्र पाळला जातो. क्षयरोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर करते. यावर्षीचे घोषवाक्य आहे, ‘होय! आपण क्षयरोग संपवू शकतो.’

24 मार्च 1882 या दिवशी रॉबर्ट कॉक नावाच्या शास्त्रज्ञाने क्षयाच्या जंतूचा शोध लावला. त्याप्रीत्यर्थ हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. यानिमित्ताने दरवर्षी क्षयरोगाच्या निर्मूलन – उच्चाटनासाठी जगभर प्रयत्न केले जातात. सर्वसामान्य नागरिकांमध्ये क्षयरोगाबद्दल जनजागरण केले जाते. मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्यूलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा क्षयरोग म्हणजे र्ढीलशीर्लीश्रेीळी (ढइ) हा अजूनही एक महत्त्वाचा संसर्गजन्य रोग आहे. नख, केस आणि दात वगळता शरीरातील कोणत्याही अवयवाला होणारा हा आजार मुख्यत्वेकरून फुफ्फुसांमध्ये आढळतो. एकमेकांमध्ये पसरणारा हा क्षयरोग पृथ्वीवरून नाहीसा करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन-तीन वर्षांत म्हणजे 2025 पर्यंत क्षयरोग संपुष्टात आणण्यासाठी भारत सरकारचे आणि आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत.

2021 च्या आकडेवारीनुसार जगभरात 106 कोटी लोकांना क्षयरोगाने ग्रासले होते, तर या वर्षात जवळपास 16 लाख लोक क्षयरोगामुळे मृत्युमुखी पडले. यापैकी जवळपास एक तृतीयांश व्यक्ती या भारतातल्या आहेत.

कोव्हिड काळात सार्‍या जगाचे आणि अर्थातच वैद्यकीय यंत्रणांचे लक्ष कोव्हिडवर केंद्रित झाल्यामुळे इतर आजारांकडे काहीसे दुर्लक्ष झाले. क्षयरुग्णांची शोधमोहीम काहीशी थंडावली आणि क्षयरुग्णांवरील उपचारात शिथिलता आली. अनेक रुग्णांनी या काळात त्यांना सुरू असलेले औषधोपचार बंद केले. या सर्वांचा परिणाम गेल्या दोन वर्षांत क्षयरुग्णांची संख्या वाढण्यात झाला.

सामाजिक – आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, ज्यांना आधीपासूनच क्षयरोगाचा धोका होता, त्यांच्यामध्ये कोव्हिडमुळे हा धोका अधिकच वाढला.

क्षयरोग (टीबी) हा आजार शरीरात कुठेही उद्भवत असला, तरी तो मुख्यत्वेकरून फुप्फुसांमध्ये आढळतो. उघड्यावर शिंकणे, खोकणे, थुंकणे, मोठ्याने बोलणे, हसणे अशा क्रियांमधून क्षयाचे जंतू क्षयरुग्णांकडून निरोगी व्यक्तींमध्ये पसरतात आणि क्षयरोगाचा संसर्ग वाढतो.

जेव्हा क्षयाचा जंतू आपल्या शरीरात प्रवेश करतो, तेव्हा शरीरात क्षयजंतूंची वाढ होते; पण त्याचे रूपांतर प्रत्यक्ष आजारात होत नाही. अशा रुग्णांमध्ये क्षयाची लक्षणे दिसून येत नाहीत. या स्थितीला अव्यक्त क्षयरोग म्हणतात. अशा व्यक्तींपैकी जवळपास दहा टक्के व्यक्तींना भविष्यात क्षयरोग होतो. कोणत्याही कारणामुळे शरीरातील रोगप्रतिकार क्षमता कमी झाली किंवा ज्या व्यक्तींना मधुमेह, एचआयव्ही-एडस्, कर्करोग यासारखे दीर्घकालीन विकार आहेत. त्यांच्यामध्ये सक्रिय क्षयरोगाचा म्हणजे अलींर्ळींश र्ढीलशीर्लीश्रेीळी चा धोका वाढतो. कोव्हिड संसर्गामुळे अशा अव्यक्त क्षयरुग्णांमध्ये सक्रिय क्षयरोग झपाट्याने वाढला असल्याचा संशय आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षीचे घोषवाक्य आहे, धशी ! थश लरप शपव ढइ! म्हणजेच ‘होय! आपण क्षयरोग संपवू शकतो.’ क्षयरोगाच्या त्वरित निदानासाठी आणि उपचारासाठी हालचाल केली, तर क्षयरोगावर वेगाने मात करता येईल. ज्यांना क्षयरोग आहे त्यांनी आपला उपचार काटेकोरपणे आणि नियमितपणे संपूर्ण कालावधीसाठी घेतला, तर ते सहजपणे क्षयमुक्त होतील. ज्यांना क्षयरोगाची बाधा झालेली नाही, अशा सर्वांनी क्षयरोग होऊ नये म्हणून जागरूक राहावे लागेल.

ज्यांना तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला आहे, अशक्तपणा, थकवा आहे. संध्याकाळचा ताप येतो, रात्रीचा घाम येतो, भूक लागत नाही, वजन कमी झाले आहे, खोकला येतो, खोकल्यातून थुंकी- बेडका पडतो, खोकल्यातून रक्त पडते, थोड्याशा श्रमाने धाप लागते, छातीत अस्वस्थ वाटते अशा सर्व रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी विनाविलंब करून घ्यावी आणि तो क्षयरोग तर नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी. पोस्टकोव्हिड कालावधीमध्ये श्वसनाच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी त्वरित डॉक्टरांकडे जावे आणि पोस्टकोव्हिड तक्रारी कशामुळे आहेत, याची तपासणी करून त्यानुसार उपचार घ्यावेत.

क्षयरोगाचे निदान करण्यासाठी रुग्णाची थुंकी तपासणी, रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे, लसिका ग्रंथी वाढली असेल, तर त्याची एफएनएसी किंवा बायोप्सी करून क्षयरोगाचे निदान होते. थुंकीत क्षयाचे जंतू सापडले नाहीत, तर ब—ाँकोस्कोपी करून श्वासनलिकेतील स्राव तपासून त्यानुसार क्षयरोगाचे निदान करता येते.

क्षयरोगावर उपचार आहेत. क्षयरोग संपूर्ण बरा होतो. एखाद्या रुग्णाने नियमित औषधोपचार घेतला नाही किंवा औषधोपचार घेण्यात टाळाटाळ केली, तर कालांतराने क्षयाचे जंतू औषधोपचाराला दाद देत नाहीत. अशा प्रकारच्या क्षयरोगाला एमडीआर टीबी किंवा एक्सडीआर टीबी असे संबोधतात. एमडीआर किंवा एक्सडीआर टीबी असलेला रुग्ण दरवर्षी नवीन पंधरा लोकांना क्षयाचा संसर्ग देतो आणि तो अशाच प्रकारचा गंभीर क्षयरोग असू शकतो. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

क्षयरोगाचा प्रसार थांबवता येतो; पण त्यासाठी अशा रुग्णांचे त्वरित निदान करून, उत्तम औषधोपचार देऊन त्यांना रोगमुक्त करणे आणि त्यांच्यापासून समाजात पसरणारा क्षयरोग थांबवणे, हे महत्त्वाचे पाऊल ठरते. यासाठी सर्वसामान्य व्यक्तींनी क्षयरोगाबद्दल माहिती घ्यावी. उघड्यावर शिंकणे, कुठेही उघड्यावर थुंकणे, क्षयरोगावरील औषधोपचारात टाळाटाळ करणे आणि एकंदर आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अशा विविध कारणांमुळे क्षयरोग पसरत जातो.

जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने आपण सजगपणे एकत्र प्रयत्न करूया! सर्वांनी एकदिलाने एकजुटीने काम केले, तर ‘होय! आपण क्षयरोग संपवू शकतो.’

डॉ. अनिल मडके

Back to top button