मोतीबिंदू आणि आयुर्वेद | पुढारी

मोतीबिंदू आणि आयुर्वेद

मोतीबिंदूचा त्रास असणार्‍यांनी दररोज आरोग्यवर्धिनी तीन गोळ्या, दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी चावून खाणे. योगवाही त्रिफळा चूर्ण तूप, मधाबरोबर रात्री घेणे. सुरवारी हिरडा मधात उगाळून डोळ्यात अंजन करणे. वातानुलोमन होण्यासाठी हिरडाचूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण रात्री 1 चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावा. नेत्ररक्षावटी आणि चंद्रप्रभा तीन, तीन गोळ्या, दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी घेणे.

रसायनचूर्ण सकाळी 1 चमचा घ्यावे. त्रिफळा 3 भाग+दालचिनी 3 भाग+ लोह भस्म 3 भाग+जेष्ठमध 3 भाग असे मिश्रण 21 दिवस तूप आणि मधातून घ्यावे. महात्रैफलघृत 2/2 चमचे सकाळ संध्याकाळ घ्यावे. निवडक हिरडा, बेहडा आणि आवळा तुकडे घेऊन पाण्यांत उकळावे. ते पाणी गाळावे. गार झाल्यावर ड्रॉपरने डोळ्यांत थेंब टाकावे. किंवा आयग्लासमध्ये ते पाणी भरून डोळे धुवावे.

ग्रंथोक्त उपचार : सप्तामृत लोह, त्रिफळाचूर्ण, महात्रैफलघृत.
विशेष दक्षता आणि विहार : पायात पादत्राणे, डोक्यावर टोपी, डोक्याला शक्यतो पांढरे वस्त्र, पांढरे कपडे वापरावेत.
पथ्य : दुधीभोपळा, कारले, पडवळ, दोडका, गाईचे तूप, मूग, कोथिंबीर, मनुका, गाईचे दूध, डाळिंब, खडीसाखर, पिण्याकरिता पावसाचे पाणी.
कुपथ्य : बारीक अक्षरांचे कमी उजेडात वाचन टाळावे. वाहनांत बसून वाचन करू नये.
रसायनचिकित्सा : सुरवारी हिरड्याचे अंजन.
रूग्णालयीन उपाचार : शस्त्रकर्म, तज्ज्ञांचे देखरेखीखाली गुदुगुल्या केल्यासारखा व्यायाम.
अन्य षष्ठी उपक्रम (पंचकर्मादि) : घरगुती स्वरुपाचे कापराचे अंजन.
चिकित्साकाल : दीर्घकाळ.
निसर्गोपचार : पायात पादत्राणे, कोवळ्या उन्हात पहाणे. जागरण टाळावे. रात्रौ लवकर झोपावे.
अपुनर्भवचिकित्सा : रोज रसायनचूर्ण न विसरता घेणे.
संकीर्ण : डोळ्याचा अतियोग किंवा मिथ्या योग टाळावा. प्राथमिक अवस्थेत असेल तर औषधाने बरा होतो.

Back to top button