हट्टी मुलांना या सोप्या पद्धतीने हाताळा | पुढारी

हट्टी मुलांना या सोप्या पद्धतीने हाताळा

पुढारी डिजीटल : मुलांना समज येत जाते तसा त्यांचा हट्टीपणा वाढत जातो. विशेषत: टीनएजर किंवा त्यापेक्षा थोड्या खालच्या वयोगटात हट्ट करण्याचं प्रमाण जास्त आहे. हट्टी मुलं अनेकदा पालकांसाठी डोकेदुखी बनतात. पालक नेहमीच आपल्या मुलांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतात. ही या मागण्या पुरवताना मुलं अनेकदा हट्टी बनतात. पण अनेकदा मुलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.
याचा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर परिणाम होताना दिसतो.

अशा वेळी पालकांची पंचाईत होते. मुलांचा हट्ट पुरवावा तर त्यांचा हट्टीपणाला उत्तेजन दिल्यासारखं होतं. आणि नकार द्यावा तर मुलांची चिडचीड सहन करावी लागते. यावर कोणत्या सुवर्णमध्य काढायचा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • ‘नाही’ हा शब्द सहन करायला शिकवणे :
    पालक जेव्हा सतत मुलांची मागणी पूर्ण करू लागतात त्यावेळी मुलांना नाही हा शब्द ऐकणं अवघड वाटू शकतं. त्यामुळे पालक जेव्हा एखादी मागणी पूर्ण करू शकत नाहीत त्यावेळी ते अनेकदा रडतात, गोंधळ घालतात. अशा परिस्थितीत पालकही कात्रीत सापडतात. अशा वेळी पालकांनी शांत राहणं महत्त्वाचं असतं. नाही हा शब्द मुलांना ऐकण्याची सवय नसते. अशा वेळी नकार ऐकण आणि तो पचवणं हे किती महत्त्वाचं आहे हे मुलांना समजावा.
  • प्रतिसाद :
    कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देणं ही बाब मुलं पालकांकडून शिकत असतात. त्यामुळे पालक म्हणून मुलांसमोर कशाप्रकारे व्यक्त होता हे देखील महत्वाचं आहे. मुलं हट्ट केल्यावर पालक जितक्या शांतपणे प्रतिसाद देतात मुलांना त्यातून समाज मिळत जाते. हट्ट केल्यावर मुलांना मारणं किंवा रागावणं याने परिस्थिति आणखी बिघडू शकते.
  • मध्य काढणं :
    मूल हट्ट करू लागल्यावर पालकांनी त्यांना ही बाब कशी चुकीची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला मुलं अर्थातच ऐकणार नाहीत. पण समजून काढून हट्टाला असलेला दुसरा पर्याय योग्य आहे हे दाखवून दिल्यास मुलांना समजावून सांगणं अधिक सोपं जाईल.
  • लक्ष वळवणं :
    मूल हट्ट करू लागताच त्याचं आवडत्या खेळाकडे किंवा खेळण्याकडे लक्ष वळवावं. शक्य असल्यान त्या ठिकाणाहून मुलांना थोडं लांब घेऊन जाण्यानेही फरक पडू शकतो.

Back to top button