मूळव्याधीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच, जाणून घ्‍या लेसर उपचार कसा ठरतो प्रभावी | पुढारी

मूळव्याधीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच, जाणून घ्‍या लेसर उपचार कसा ठरतो प्रभावी

Piles Symptoms, Precautions & Treatment :मूळव्याधीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे (मास्टर ऑफ सर्जरी, फेलोशिप इन लेझर सर्जरी) आणि डॉ. श्रुतिका म्हेत्रे (योग आणि निसर्ग उपचार तज्ज्ञ) स्वरूप हॉस्पिटल, विटा – 9421139298, 7709877322 Email – swaroophospitalvita@gmail.com

आधुनिक जीवनशैलीत मूळव्याधची समस्या अनेकांना भेडसावते. आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि इतरही कारणांमुळे मूळव्याधचा त्रास असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मूळव्याध का होतो, त्याचे प्रकार जाणून घेवूया. तसेच डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे आणि डॉ. श्रुतिका म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा येथील स्वरूप हॉस्पिटलमध्ये गेली ३ वर्षं मोफत मूळव्याध तपासणी आणि लेझर उपचार शिबिर घेतले जाते या उपाचाराविषयीही त्‍यांनी दिलेली माहिती घेवूया. (Piles Symptoms, Precautions & Treatment)  सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मूळव्याध म्हणजे गुद भागात आलेली सूज होय. शौचाच्या वेळी वेदना, काहीवेळा रक्तस्त्राव ही होतो. वारंवार होणारी मलप्रवृत्ती, बद्धकोष्ठता, शौचाच्या तक्रारी, शौचा वेळी किंवा नंतर रक्तस्त्राव होणे, शौचाची जागा बाहेर आल्यासारखे वाटणे अशा विविध तक्रारी मूळव्याधमध्ये दिसतात. सुरुवातीला आपण गुदगत विकाराचे कोणकोणते प्रकार पडतात ते पाहू. त्यानंतर मूळव्याध संबंधी लक्षणं असतील तर काय काळजी घेतली पाहिजे, काय आहार घ्यावा, कोणते पदार्थ टाळले पाहिजेत याची माहिती घेऊ. त्यानंतर लेझर उपचारांचा मूळव्याधच्या उपचारात कसा लाभ होतो, या उपचार पद्धतीचे फायदे कोणते आहेत, ही उपचार पद्धती कशा प्रकारे काम करते याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

गुदगत विकाराचे प्रकार

• अर्श किंवा मूळव्याध या प्रकारामध्ये गुद भागाच्या आतील जागेत सूज येते आणि गुद भागाच्या बाहेर सूज जाणवते.
• फिशर, परिकार्तिकामध्ये जखम होते व शौचाच्या वेळी तीव्र वेदना होतात.
• फिश्चुला किंवा भगंदर यामध्ये गुद भागाच्या बाहेरच्या त्वचेवर पूळीसारखी जखम होते
• पूय निर्मिती, अॅबसेस किंवा जंतूसंसर्ग – यामध्ये गुदाच्या भागी किंवा आजूबाजूला अचानक सूज येते.
• गुदभ्रंश – मोठ्या आतड्याचा गुदावयवाचा संपूर्ण भाग बाहेर येतो.

पाईल्सचे स्थानानुसार प्रकार

१. अंतर्गत मूळव्याध (Internal) – हा मूळव्याध गुदाच्या आतील भागात होतो.
२. बाह्यगत मूळव्याध (External) – गुदाच्या बाहेरील भागात होणारा हा मूळव्याध आहे. यालाच कोंब असेही म्हटले जाते.

मूळव्याध असल्याची लक्षणे

मूळव्याध (Piles) म्हणजे गुदद्वार-पक्काशय या भागातल्या फुगलेल्या रक्तवाहिन्या होय. शौचाला होताना या फुगलेल्या रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव थेंबाच्या स्वरुपात तर कधीकधी धारेच्या स्वरुपात होतो.
या फुगलेल्या रक्तवाहिन्यांना सूज (inflammation) येते आणि त्यात जंतूसंसर्ग (Infection) होतो. त्यामुळे शौचाच्या वेळी वेदना, आग होणे, बसताना त्रास होणे असे प्रकार होतात. कधीकधी रक्तस्त्राव हे एकच लक्षण असते (Uninfected).
तर कधीकधी रक्तस्त्राव न होता फक्त वेदना, जळजळ होते आणि गुदद्वाराच्या स्थानी गाठीसारखा भाग तयार होतो.

फिशर लक्षणे कोणती?

गुदाच्या बाहेरच्या भागातील वेदनयुक्त जखम म्हणजे फिशर होय. Fissure हा सर्वात जास्त वेदना व जळजळ असणारा प्रकार आहे. यात होणारा रक्तस्त्राव हा अगदी कमी व शौचाला चिकटून होतो. फिशर आजारात कठीण मलप्रवृत्तीमुळे जखम होते.
भगंदर (Fistula) म्हणजे गुदभाग जवळ झालेली न भरणारी जखम होय. Fissure झाल्यानंतर व्यवस्थित उपचार घेतले नाही तर Fissureच्या जखमेतून जंतूसंसर्ग होतो. तो संसर्ग वाढत जातो आणि गुदद्वाराच्या शेजारच्या जागेतून गळू होऊन त्यातून पुन्हा-पुन्हा पू (Pus) येत राहतो. थोडक्यात भगंदर (Fistula) गळूचाच प्रकार आहे.

भगंदरवरील उपचार

भगंदरवर औषधी धागा बांधण्याचा उपचार केला जातो. भगंदर उपचारमधील असलेल्या विविध पद्धतींमध्ये लेसर आणि त्या सोबत सेटॉन (seton) म्हणजेच धाग्याचा उपयोग करून भगंदरच्या जखमेचा उपचार केला जातो. या उपचार पद्धतीचे चांगले परिणाम दिसून आलेले आहेत.

मूळव्याधच्या अवस्था

मूळव्याधच्या चार अवस्था आहेत. प्रथम व द्वितीय अवस्थेमधील मूळव्याध औषधोपचार किंवा मूळव्याधाची वाढ थांबवण्यासाठीच्या इंजेक्शनने पूर्ण बरा होतो. मात्र तृतीय आणि चौथ्या अवस्थेतील मूळव्याध असल्यास त्यास लेझर ट्रिटमेंट किंवा शस्त्रक्रियेची गरज पडते. तृतीय किंवा चौथ्य अवस्थेतील मूळव्याधमध्ये जर जास्त रक्तस्राव आणि वेदना होत असतील तर तातडीने उपचार करावे लागतात.

स्वरूप हॉस्पिटलमूळव्याध (पाईल्स) का होतो?

पाइल्स हा आजार फक्त माणसांतच बघायला मिळतो. आपल्या उभे राहण्याचा तो परिणाम आहे. गुदद्वार आणि आजूबाजूच्या भागात असणाऱ्या रक्तवाहिन्या या उभ्या असतात आणि त्यात Valves नसतात. सामान्य माणसात पक्काशयाचा शेवटचा अर्धा भाग रिकामा असतो. पण ज्या लोकांमध्ये जुनाट मलबध्दतेचा त्रास असतो त्यांच्यात त्या खालच्या भागातही मळ साठत जातो. पक्काशयात साठलेला मळ त्याच्या भिंतीवर दाब निर्माण करतो त्यामुळे रक्तवाहिन्या दाबल्या जातात व त्यांचा शेवटचा भाग फुगतो, त्यालाच आपण मुळव्याध (Piles) म्हटले जाते.

मूळव्याध (Piles) झाल्‍यानंतर होणारा शारीरिक त्रास

मूळव्याधमध्ये शौचावेळी गुदद्वार-पक्काशय येथील फुगलेल्या रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तस्त्राव होतो. हा रक्तस्त्राव थेंबाच्या स्वरुपात तर कधी कधी धारेच्या स्वरुपात होतो. या फुगलेल्या रक्तवाहिन्यांना सूज (Inflammation) येते. त्यात जंतुसंसर्ग (Infection) होते. त्यामुळे शौचाच्या वेळी वेदना होतात, आग होते, बसताना त्रास होतो. कधीकधी रक्तस्त्राव हे एकच लक्षण असते (Uninfected). तर कधीकधी फक्त वेदना जळजळ व गुदद्वाराच्या स्थानी गाठीसारखा भाग असतो.

मूळव्याध व गुदगत विकारासाठी लेझर ट्रीटमेंट

लेझर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूळव्याधीमध्ये आलेली सूज त्या भागाचा फुगवटा कोणतीही मोठी जखम न करता बरा केला जातो. गुदगत विकारासाठी डायोड लेझरचा प्रामुख्याने वापर केला जातो. यात एका छोट्याशा यंत्राद्वारे त्यातील लेझर एनर्जीचा वापर करून शरीरात नको असलेल्या भाग, सूजलेला भाग कमीत कमी वेळात, जखमेशिवाय काढून टाकण्यात येतो.

लेझर नेमके काय कार्य करते?

आतील किंवा बाहेरील मूळव्याधीचा सुजलेल्या भाग आकुंचन करून बरा केला जातो. रक्तवाहिन्याची मुळे बंद केली जातात.तसेच त्यांच्या पुन्हा वाढीस प्रतिबंध केला जातो.

मूळव्याधसाठी लेझर ट्रीटमेंट

मुळव्याध, भगंदर, फिशर, आदी गुदगत विकारासाठी लेझर उपचार पद्धतींचा फार चांगला उपयोग होतो.

लेझर उपचाराचे फायदे

मूळव्याधवर लेझरने उपचार करताना कोणतीही चिरफाड करावी लागत नाही, त्यामुळे जखम होत नाही. अल्प रक्तस्त्राव असणारी ही ट्रीटमेंट आहे. लेझर उपचारानंतर लवकर डिस्चार्ज मिळतो, शिवाय रिकव्हरीही वेगाने होते. कमी वेळा पुन्हा तपासणी करता येते. उपचारानंतर शौचावरील नियंत्रण जात नाही आणि मूळव्याध पुन्हा होत नाही. शिवाय उपाचारा वेळी कमीत कमी वेदना होतात.
लेझर उपचार पद्धती यशस्वी होण्याची टक्केवारी फार जास्त आहे. ही उपचार पद्धती ज्येष्ठ नागरिक, अल्पबल स्त्री आणि पुरुष, रक्तक्षय असलेले रुग्ण, उच्च रक्तदाब असणारे, तसेच मधूमेह असणारे रुग्ण यांच्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. तसेच फार कमी वेळा पुन्हा तपासणीची गरज पडते.

विटा येथील स्वरूप हॉस्पिटलमध्ये मूळव्याधवर लेझर पद्धतीने उपचार केले जातात. स्वरूप हॉस्पिटलमध्ये गेली ३ वर्षं मोफत मूळव्याध तपासणी आणि लेझर उपचार शिबिर घेतले जाते. डॉ. शिवप्रसाद म्हेत्रे आणि डॉ. श्रुतिका म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्ण या शिबिराचा लाभ घेतात. लेझर ट्रीटमेंट, आवश्यक तपासण्या, औषधे, भूलतज्ज्ञांची फी इत्यादी माफक दरात उपलब्ध करून दिले जातात. आतापर्यंत १००च्या वर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

गुद प्रक्षालण (स्वच्छता कशी राखावी?)

गुदद्वार हा शरीराचा दुर्लक्षित भाग आहे. म्हणून गुद भागाची स्वच्छता राहण्यासाठी शौचालयासाठी योग्य ठिकाणी जावे. स्वच्छ पाण्याचा वापर करावा. शौचानंतर हात साबणाने धुवावेत. महत्त्वाचे म्हणजे गुदभाग धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा व साबणाचा वापर करावा.

मूळव्याध संबंधी लक्षणं असल्यास कोणती पथ्ये पाळावीत?

• जेवताना पाणी प्यावे. जेवणानंतर किमान १ तास पाणी पिऊ नये. (भोजने अमृतं वारि भोजनान्ते विषप्रदम् ।)
• रात्रीचे जेवण ८ वाजायच्या दरम्यान घ्यावे जेवणात शेवटी दूधपोळी, दूधभाकरी, किंवा दूधभात घ्यावा.
जेवणात अत्यंत पातळ ताक घ्यावे.
• जेवणात कोबी, फुलकोबी, घोसाळे, दोडका, भोपळा, तांबडा भोपळा, पडवळ, शेवगा, सुरण, भेंडी, तोंडली घ्यावीत.
• मुगाच्या डाळीचे वरण उत्तम.
• गाईचे दूध, तूप, आमसूल, अंजीर यांचा वापर वाढवावा.
• फळे खावीत, केळांचा उत्तम उपयोग होतो.
• रात्री झोपताना २ चमचे तूप गरम दुधात टाकून घ्यावे.
• काळ्या मनुकांचा (किसमिस) उत्तम उपयोग होतो.

काय टाळाल?

• बाहेरचे सर्व पदार्थ तसेच तळलेले, आंबवलेले पदार्थ संपूर्ण वर्ज्य करावेत.
• हिरवी मिरची, काळा मसाला वर्ज्य करावे..
• तुरीची डाळ, लोणचे, पापड काही दिवस वर्ज्य करावे.
• मांसाहार संपूर्ण वर्ज्य करावा.
• मद्यपान संपूर्ण वर्ज्य करावे.
• वाल, गवार, वांगे, बटाटे टाळावेत.
• रक्तस्त्राव असेल तर पपई व चिकू टाळावे.
• मेथी, पालक, अळूची पाने ही पित्तकर द्रव्ये आहेत, ती घेऊ नयेत.
• मोड आलेली कडधान्ये शक्यतो टाळावीत.
• बेकरीचे पदार्थ टाळावे. चहा व कॉफी थोडी आणि २ वेळेच घ्यावी.
• उपवास करु नये, शेंगदाणे, साबुदाणा विशेष करून टाळावेत.

स्वरूप हॉस्पिटल  (विटा, जिल्हा सांगली)येथे  लाईव्ह सेकंद सर्जिकल वर्कशॉप नुकतेच झाले. या वर्कशॉपसाठी राज्याच्या विविध भागातून डॉक्टरर्स सहभागी झाले. याच वेळी मूळव्याध इंजेक्शन, लेझर ट्रिटमेंट, शिबीरही घेण्यात आले, याचा लाभ विविध भागातील रुग्णांना झाला. 

संकलन – विजय भास्कर लाळे

Back to top button