गुगलने ज्या ‘बबल टी’चे डुडल बनवले, तो चहा नक्की आहे तरी काय ?.. जाणून घ्या सविस्तर | पुढारी

गुगलने ज्या 'बबल टी'चे डुडल बनवले, तो चहा नक्की आहे तरी काय ?.. जाणून घ्या सविस्तर

पुढारी ऑनलाईन: करोनामुळे जवळपास सर्वांनाच घरी बसावे लागले. या लॉकडाउनच्या काळामध्ये लोकांनी घरी बसून नव-नवीन पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यामधील एक पदार्थ भारतामध्ये खूप प्रसिद्ध झाला तो म्हणजे ‘बबल टी’ (फेसाळलेला चहा). लोकांना नवीन पदार्थ नेहमी ट्राय करायला आवडतात. प्रत्येकाच्या जिभेला वेगळे खायची चटक असते. पण हा चहा नक्की कुठल्या देशातील आहे, आपल्याला माहित आहे का ? याची सुरुवात कशी झाली ते पाहू .

बबल टी हा पदार्थ मूळचा तैवानमधील प्रसिद्ध चहा आहे. भारतामध्ये बबल टी पिण्याचा ट्रेंड सुरु आहे. आज गूगलने तर बबल टी वर डूडल तयार केले. हे डूडल तयार करण्याची सुरुवात २९ जानेवारी २०२० ला झाली. बबल चहा हा थंड आणि गरम प्रकारात तयार केला जातो. म्हणजे याचे कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी सारखे झाले. १९८० ला तैवानमध्ये आलेला बबल टी हा नव्वदच्या दशकामध्ये युनायटेड स्टेटपर्यंत पोहचला. ३० एप्रिल हा दिवस तैवानने अधिकृतपणे बबल टी डे म्हणून घोषित केले. तेव्हापासून तिथे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हॉंगकॉंग, जपान ,सिंगापूर आणि मेनलँड चायना तरुणांमध्ये या पेयाचा ट्रेंड वाढला आहे. भारतामध्ये तर ‘बबल टी’साठी लागणारा टॉपिओका हा चक्क शाबूदाण्याचा वापर करून बनवला जातो. ‘बबल टी’ला बबल दूध चहा, टॉपिओका दूध चहा, बोबा चहा, अशा नावांनी ओळखले जाते. अलीकडे बबल टी आईस्क्रीम, बबल टी पिझ्झा, बबल टी टोस्ट, बबल टी सुशी अशी बबल पासून फूड तयार व्हायला लागले आहेत.

भारतातील लोकांसाठी चहा हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण या बबल टीचे काही दुषपरिणाम ही आहेत. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. बबल टीलासुद्धा आरोग्याच्या दृष्टीने दोन बाजू आहेत. हृदय व रक्तवाहिन्या संबंधी रोग मधुमेह, संधिवात आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यासाठी ‘बबल टी’चा उपयोग होतो. परंतु याने कॅलरी वाढण्याचा धोका आहे. तुम्ही बबल टी च्या प्रेमात पडा पण जरा जपून !

Back to top button