हिवाळ्यात मुलांना न्यूमोनियाचा धोका, ‘अशी’ घ्या काळजी

हिवाळ्यात मुलांना न्यूमोनियाचा धोका, ‘अशी’ घ्या काळजी
Published on
Updated on

गेल्या काही आठवड्यांपासून बदललेले हवामान, तापमानातील चढ-उतार आणि उच्च आर्द्रता यामुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनिया आणि श्वासोच्छवासाच्या समस्येत वाढ झाली आहे. फ्लू, पोटातील कृमी आणि इतर संक्रमण वेगाने पसरत आहेत.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना मधुमेह आणि दमा यासारख्या समस्या आहेत, त्या मुलांची स्थिती या काळात आणखी बिघडण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. याच्या लक्षणांमध्ये थंडी वाजून ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, कफ येणे, कोरडा खोकला, सर्दी, थकवा, उलट्या, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात.

हिवाळा हा श्वसनाच्या आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देतो. हवामानातील सततच्या बदलांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या बालकांना फुफ्फुसाच्या दीर्घकालीन समस्या जसे की दमा, बाँकायटिस, जन्मजात हृदयरोगाचा सामना करावा लागतो. किडनीचे आजार आणि इतर श्वसनाच्या परिस्थितीमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. हे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे फुफ्फुसाचे गंभीर नुकसान होऊ शकते. कोणतीही गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी मुलांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात संसर्गजन्य आजार जास्त प्रमाणात आढळतात. कारण, जेव्हा एखादी आजारी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा कोरड्या हवेत हे विषाणूचे थेंब अधिक सहजतेने पसरतात. बदलत्या वातावरणामुळे लहान मुले अशा विषाणूजन्य साथीच्या रोगांचा बळी पडतात.

मुलांना जास्त गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे.
आजारी लोकांशी संपर्क मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
खोकताना तोंड व नाक झाकून घ्यावे.
हात चांगले धुवावेत.
संतुलित आहाराचे सेवन करावे.
न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत.
हिवाळ्यात, मुलांना उबदार कपडे घालावेत.
त्यांना पिण्यासाठी गरम सूप द्यावे.
घरी ह्युमिडिफायर वापरा आणि प्रदूषण टाळावे.

डॉ. चेतन जैन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news