भरड धान्यांच्या सेवनाने घटते कोलेस्टेरॉल | पुढारी

भरड धान्यांच्या सेवनाने घटते कोलेस्टेरॉल

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांकडून २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ (इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेटस्) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांना याबाबत विनंती केली होती. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी (भगर), राळा, भादली आदी भरड धान्ये आहेत. आरोग्यासाठी अशा धान्यांचे सेवन अत्यंत लाभदायक ठरते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

या धान्यांचे पदार्थ केवळ वाईट कोलेस्टेरॉल घटवतात असे नव्हे; तर चांगले कोलेस्टेरॉल वाढवतातही. या धान्यांच्या सेवनाने इन्सुलिनचा स्तर नियंत्रित ठेवण्यास मदत होते तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी या धान्यांचे सेवन लाभदायक ठरते. तसेच आतड्याच्या कर्करोगाचा धोकाही या धान्यांच्या सेवनाने कमी होतो. या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने पचनसंस्थेला त्याचा लाभ मिळत असतो.

संबंधित बातम्या
Back to top button