कोरोनामुक्तीनंतर करा हृदयाची तपासणी | पुढारी

कोरोनामुक्तीनंतर करा हृदयाची तपासणी

डॉ. बिपीनचंद्र भामरे

कोरोना केवळ श्वसन प्रणालीच नव्हे तर इतर अवयवांबरोबर आपल्या हृदयावरदेखील परिणाम करतो. आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी, निरोगी जीवनशैलीसह, संतुलित आहार आणि व्यायामाचा दैनंदिन जीवनात समावेश करणे आवश्यक आहे. आपल्या हृदयाच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्यासाठी दर 6 महिन्यांनी हृदयाची तपासणी करण्याची शिफारसदेखील केली जाते. असे न केल्यास हृदयाच्या समस्या वेळीच दूर करणे अशक्य होईल. म्हणूनच वेळोवेळी तपासणीस प्राधान्य दिल्याने आपले हृदय सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

दीड वर्षाहून अधिक काळ उलटूनही संपूर्ण देश आजही कोव्हिड- 19 या आजाराशी लढा देत आहे. आजही या आजाराची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येते आणि आता तिसर्‍या लाटेचीही शक्यता वर्तविली जात आहे. या आजाराने जीवनातील प्रत्येक घटकावर परिणाम झाला आहे. या प्राणघातक विषाणूने केवळ फुफ्फुसांवरच नव्हे तर मेंदूवरही परिणाम केला आहे. कोव्हिडमुक्तीनंतर हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि हृदयरोगाचा इतिहास असलेल्या रुग्णांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाचा हृदयावर परिणाम

बरे झालेल्या कोरोना रुग्णांपैकी बहुतेकांना हृदयासंबंधी इजा, हृदय निकामी होणे, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या सतावत असल्याचे दिसून आले आहे. छाती जड झाल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास आणि वेदना, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, हृदयविकाराचा झटका, मायोकार्डिटिस, हृदयाची सूज, पंपिंग क्षमता मंदावणे, रक्त गोठणे आणि असामान्य हृदयाचा ठोके आदी लक्षणेही कोव्हिडमुक्त झाल्यानंतर पाहायला मिळतात.

मधुमेह, उच्च रक्तदाब आदी

कोमॉर्बेडिटी असलेल्या कोव्हिड रुग्णांना हृदयाच्या समस्या भेडसावू शकतात. जसजसे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती विषाणूचा सामना करते, तसतसे काही निरोगी ऊतींचा देखील नाश करते. कोव्हिड संसर्गामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होते कारण यामुळे एखाद्याच्या शिरा आणि रक्तवाहिन्यांच्या आतील पृष्ठभागावर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहात अडथळे येतात. चक्कर येणे, डोकेदुखी, छातीत धडधडणे, उच्च रक्तदाब, उलट्या होणे, घाम येणे आणि दम लागणे, अशी लक्षणे दिसली की त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जर रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार झाला असेल तर व्हायरस हृदयविकारालादेखील आमंत्रित करू शकतो. म्हणूनच कोविड असलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका जास्त असतो. हृदयरोग असलेल्या रुग्णांमध्ये कोविडमुळे आणखी गुंतागुंत होऊन मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हृदयाच्या समस्या शोधण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी कार्डियाक स्क्रीनिंग हा एक महत्त्वाचा उपाय आहे. दर सहा महिन्यांनी हृदयाची तपासणी करून घेणे हे हृदयाचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्यास मदत करते आणि वेळेवर हृदयातील कोणतेही असामान्य बदल दर्शवू शकते. अशाप्रकारे, स्क्रीनिंगमध्ये इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईकेजी) समाविष्ट असतो. ज्यामुळे वाढलेल्या हृदयासाठी जोखीम घटक जसे की उच्च रक्तदाब, किंवा हृदयरोगाची इतर चिन्हे जे छातीत दुखणे किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या आहेत.

व्यायामादरम्यान ताणतणावामुळे तुमच्या हृदयामध्ये असामान्य बदल होण्यास मदत होते. इकोकार्डियोग्राम हृदयाच्या झडप, भिंती आणि रक्तवाहिन्यांमधील बदल तपासण्यासाठी हृदयाच्या आकार आदींचे निरीक्षण करण्यासाठी अल्ट्रासाऊंड पद्धतीचा वापर केला जातो.

कॅल्शियम स्कोअरिंग कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन वापरून धमन्यांच्या भिंतींवर असलेल्या पट्ट्यामध्ये तयार होणारे कॅल्शियमचा अभ्यास करणे शक्य होते. ही तपासणी केव्हा करावी हे ठरवण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे आणि पुढील वेळ वाया न घालवता हे वेळीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हृदयाची कोणतीही स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी त्याचा वेळेवर शोध घेणे हीच खरी हृदयरोगावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे.

Back to top button