दात स्वछ आणि निरोगी ठेवायचे असतील तर या गोष्टींचे सेवन करू नका

दात स्वछ आणि निरोगी ठेवायचे असतील तर या गोष्टींचे सेवन करू नका

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणूच्या साथीमुळे नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. नागरिक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अधिक लक्ष देत असले तरी, दातांच्या स्वच्छतेबाबत लोकांच्या मनात फक्त एक विश्वास आहे, की ब्रश केल्याने दातांची काळजी घेतली जाते. तुम्हीही दातांबाबत निष्काळजी असाल तर लगेच दुरुस्त करा.

रोज सकाळी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी ब्रश करा. याशिवाय चहा, कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. पण दूध प्यायल्यानंतर पाण्याने नक्की गुळणा करा. यासोबतच तुमचा आहारही सुधारा, कळत-नकळत अशा अनेक गोष्टी आपण सेवन करतो, कि त्या दातासाठी योग्य नसतात. तुम्हालाही तुमचे दात स्वछ आणि निरोगी ठेवायचे असतील तर या गोष्टींचे सेवन करू नका.

सॉस
दंतवैद्य यांच्या सल्यानुसार सॉस खाल्याने दात खराब होऊ शकतात. विशेषतः टोमॅटो सॉस आणि सोया सॉस दातासाठी खुप हानिकारक असतात

कोल्ड ड्रिंक्स
अनेकदा लोक फ्रेश होण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स म्हणजेच एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. हे दातासाठी हानिकारक असतात. कोल्ड ड्रिंक्स म्हणजेच एनर्जी ड्रिंक्सचे सेवन कमी करा. याच्या बदल्यात नॅचरल ड्रिंक पिऊ शकता.

कैंडी
गोड खाल्ल्याने दात किडतात. अनेकदा लहान मुलांचे दात जास्त कँडी खाल्ल्याने किडतात. यासोबतच दातांमध्ये संवेदनशीलताही येऊ लागते. यासाठी गोड कमी खा. तसेच चहा कमी प्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news