दुधात मनुके खाल्ल्याने होतात हे 5 आरोग्यदायी फायदे! | पुढारी

दुधात मनुके खाल्ल्याने होतात हे 5 आरोग्यदायी फायदे!

पुढारी ऑनलाईन: दुधात मनुके टाकून प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. मनुके हेल्दी फॅट्स, कार्ब्स, फायबर, कॉपर, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम यांचा उत्तम स्रोत आहे, तर दुधात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असते. याशिवाय मनुके अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनॉल्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचाही चांगला स्रोत आहे. नियमित दुधात मनुके खाल्ल्यास शरीरात पोषणाची कमतरता भासत नाही. यासोबतच अनेक गंभीर आजारही दूर राहतात. चला तर मग जाणून घेऊया दुधात मनुके खाण्याच्या फायद्यांबद्दल.

स्मरणशक्ती वाढते

जर तुम्ही दररोज दूध आणि मनुके खाल्ल्यास चिंता, तणाव यासारख्या समस्या दूर होतात, स्मरणशक्ती तीक्ष्ण होते आणि मेंदूचे कार्य सुधारते.

चांगली झोप

रात्री झोपण्यापूर्वी मनुका आणि दुधाचे एकत्रतीत सेवन केल्याने निद्रानाश होत नाही. हे तुम्हाला पुरेशी आणि चांगली झोप घेण्यास मदत करते.

हाडे मजबूत होण्यास मदत

दूध आणि मनुके यामध्ये कॅल्शियम, बोरॉन नावाचे रसायन देखील असते, जे हाडांसाठी खूप फायदेशीर असते. दुध आणि मनुका खाल्ल्याने हाडे मजबूत होतात, सांधेदुखीची समस्या आणि फ्रॅक्चरचा धोकाही कमी होतो. सांधेदुखीच्या रुग्णांसाठी दुधात मनुका खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.

पोटासाठी फायदेशीर

मनुक्यामध्ये आहारातील फायबर असते. हे पचन सुधारण्यास मदत करते. आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देते आणि कोलन फंक्शन सुधारते. तसेच शरीराला डिटॉक्सिफाय करते. पोटातील गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या मनुके खाल्ल्याने दूर होतात.

अँनिमिया प्रतिबंधित करते

बेदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. मनुके खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाणे अँनिमियाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते

हृदय निरोगी ठेवते

बेदाण्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

Back to top button