पित्ताशयाचे खडे आणि होमिओपॅथिक उपचार
पित्ताशयाचे खडे सर्वसामान्य लोकांमध्ये सहज आढळून येणारी तब्येतीची तक्रार आहे आणि ही तक्रार सर्वसाधारणपणे चाळिशीत उद्भवणारा आजार आहे. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त पाहायला मिळते. म्हणूनच चाळिशीतील जाड महिला आणि ज्या स्त्रियांचे शारीरिक श्रम कमी असतात त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.
खाण्यामध्ये असणारे तेलकट व स्निग्ध पदार्थांचे सेवन जास्त झाल्यामुळे किंवा पचनास जड पदार्थ खाल्ल्यामुळे पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास उद्भवतो. हा त्रास मुख्यतः पित्ताशयाचा प्रवाह पित्ताशयाच्या पिशवीतून आतड्यातपर्यंत पोहोचण्याचा मार्गात येणारा अडथळा होय. हा अडथळा म्हणजे पित्ताशयाचे खडे. पित्ताशयाचे खडे म्हणजे त्यामध्ये आढळणारे रासायनिक घटक असतात. त्या खड्यामध्ये मुख्यतः कोलेस्ट्रॉलचे खडे, पिगमेंट स्टोन, कॅल्शियम कार्बोनेट स्टोन किंवा त्याचे मिश्रण सुद्धा असते. पित्ताशयाचे खडे हे पित्ताशयाच्या नलिकेत किंवा पित्ताशयाच्या पिशवीच्या तोंडाशी अडकतात. 90 टक्के लोकांना पित्ताशयाच्या पिशवीची सूज ही खडा अडकल्यामुळे राहते. अशा खड्यांना सोनोग्राफी करून उपचाराची गरज असते.
लक्षणे : अनेकदा पेशंटला पोटात गॅस धरणे, ढेकर येणे, जड पदार्थ खाल्ल्यानंतर पोट गच्च राहणे, उचमळून येणे, जळ जळ होणे अशी लक्षणे कायम राहतात. शक्यतो महिलांमध्ये जड पदार्थ किंवा तेलकट पदार्थ यांचे सेवन जास्त झाल्यामुळे ही तक्रार जास्त जाणवते तसेच वेदना मुख्यत: उजव्या बाजूलाच राहतात आणि त्या पाठीकडे किंवा खांद्याकडे जातात. दीर्घ श्वासाने वेदनांचे प्रमाण जास्त वाढते.
शौचाला काळपट होते व कधीकधी पोटदुखी राहते, पण हे खडे मार्गात येऊन पित्ताशयाच्या पिशवीला सूज आणतात व पोट कळीला कारणीभूत ठरतात. म्हणजे पित्त प्रवाहाला ते अडथळा आणतात तेव्हा असह्य पोटदुखी, उलटी, मळमळ व ताप ही कारणे प्रामुख्याने दिसतात. कधीकधी असह्य वेदनाांमुळे रुग्णाला अॅडमिट करावे लागते. योग्य तपासणी करून निदान व उपचाराला दिशा मिळते. सुजेमुळे ताप येणे, उलटी, मळमळ होणे हीसुद्धा लक्षणे बर्याच पेशंटना राहतात.
तपासणी : पोटाची सोनोग्राफी – यामुळे पित्ताशयाच्या पिशवीची सूज, पित्ताशयाचे खडे यांचे निदान होते. रक्ताच्या तपासणीमुळे पांढर्या पेशींची संख्या व लाल रक्त पेशी यांची मात्रा कळते. ईआरसीपी (एठउझ – एपवेीलेळिल ठशीीेंसीरवश उहेश्ररपसळे झरपलीशरीेंसीरहिू) या तपासणीने आपण यकृत पित्ताशयाची पिशवी आणि स्वादूपिंड या तक्रारीचे योग्य निदान लावू शकतो. तसेच सिटीस्कॅन (उढ डलरप अलवेाशप) नेसुद्धा योग्य निदान लागते. ङर्ळींशी र्षीपलींळेप ींशीीं हे सर्वसाधारणपणे काविळीच्या निदानासाठी उपयुक्त ठरते. वरील सर्व तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कराव्यात.
उपचार : पित्ताशयातील खडे व त्याचा त्रास व्यक्तिगणिक वेगळा असू शकतो, पण पित्ताशयाच्या खड्याची कुठलीही लक्षणे दिसतात. तसेच जे खडे पित्ताशयाच्या पिशवीत आहेत, पण प्रवाहाला अडथळा करत नाहीत, अशा लोकांमध्ये कधी कधी लक्षणे दिसत नाहीत, पण जर ते खडे प्रवाहाला अडथळा आणत असेल तर पोटदुखीचे मुख्य कारण होते व त्यानुसार उपचाराची गरज भासते.
होमिओपॅथीमध्ये या दोन्ही प्रकारच्या उपचारांसाठी औषधे आहेत. पेशंटच्या शारीरिक-मानसिक व खाण्यापिण्याच्या तक्रारींचा पूर्ण अभ्यास करून औषधांची निवड केली जाते.
पित्तकारक प्रकृती – जरी खाण्या-पिण्यावर अवलंबून असली तरीसुद्धा अनेकदा मानसिक काळजी, सतत चिडचिड, स्वभावातील भित्रेपणा सुद्धा आजाराला कारणीभूत ठरतो. तसेच जेवणामध्ये किंवा पचन प्रक्रियेवर परिणाम करू शकतो.
भूक न लागण- जेवणाचे प्रमाण किंवा जेवणाची अनियमितता या गोष्टी शारीरिक आणि मानसिक प्रकृतीवर अवलंबून असतात. होमिओपॅथिक औषधांचा उपयोग खड्यांमुळे होणारा त्रास कमी करणे तसेच पित्त प्रकृतीसुद्धा कमी करण्यास मदत करतो.
खालील होमिओपॅथिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. नक्स मोचोटा, नक्स वोमिका, ब्रायोनिया, पलसाटीला, चेलिडोनियम इत्यादी औषधे आहेत. ही सर्व औषधे व तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केल्यास उपयुक्त ठरतात.

