दात पुढे आहेत? आत घेण्यासाठी 'हा' आहे सर्वात सोपा उपाय | पुढारी

दात पुढे आहेत? आत घेण्यासाठी 'हा' आहे सर्वात सोपा उपाय

दात पुढे असल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वासही कमी राहतो. या कारणामुळे आपण काहींचा थट्टेचा विषयदेखील होऊ शकतो. परंतु, ही फार मोठी गंभीर समस्या नाही. यावर उपचार नाही, असे नाही. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे दातांना तार लावणे.

दातांचे सौंदर्य हे आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे. दातांचा योग्य आकार, रचना हे हास्याला चार चाँद लावत असतात. आपल्या जीवनात दात दोनदाच येतात. एकदा लहाणपणी सहा महिन्यांनंतर त्याची सुरुवात होते. पहिल्यांदा येणार्‍या दातांना दुधाचे दात असे म्हणतात. कालांतराने चार ते पाच वर्षांनंतर दात पडण्यास सुरुवात होते. त्यानंतर येणारे दात हे आजन्म राहतात. परंतु, काहींच्या दातांचा आकार योग्य राहात नाही आणि ते दात पुढे येऊ लागतात. या दातांचा आकार सामान्य दातांपेक्षा अधिक असतो आणि हसताना अधिक मोठे दिसतात.

दात पुढे असल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वासही कमी होतो. या कारणामुळे आपण काहींचा थट्टेचा विषयदेखील होऊ शकतो. परंतु, ही फार मोठी गंभीर समस्या नाही. यावर उपचार नाही, असे नाही. यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे दातांना तार लावणे. यामुळे काही काळ आपल्याला त्रास होऊ शकतो. परंतु, कालांतराने आयुष्यभराचे समाधान राहू शकते. तार लावल्याने सर्व दातांना चांगला आकार येतो. पुढे असलेल्या दातांना योग्य आकार देण्यासाठी काय करावे, यासाठी काही टिप्स इथे सांगता येतील.

तार लावणे

तारेचा वापर करून दात आत घेणे हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. ही तार लहान मुलगा, तरुण, ज्येष्ठ नागरिकदेखील लावू शकतो. सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी हा उपाय चांगला मानला जातो. तारा दोन प्रकारच्या असतात. एक टेम्पररी आणि दुसरी म्हणजे कायमस्वरूपी. या मार्गाने दातावर एक तार चांगल्या रितीने अ‍ॅडजेस्ट केली जाते आणि त्या कारणामुळे दातांवर दबाव वाढतो. हळूहळू दात सरळ होऊ लागतात. लहान वयातच दात पुढे येत असल्याचे दिसत असेल तर तातडीने उपाय करायला हवेत. कारण, या काळात मुलांचा जबडा नाजूक असतो आणि त्यामुळे त्यापासून लवकर दिलासा मिळू शकतो.

जीभेमुळे दातांवर ताण

मुलाचे दात खूप पुढे नसतील तर दरोज थोडावेळ त्याला जीभेने दाताच्या बाहेरून दबाव टाकायला सांगा. दात सरळ करण्यासाठी हा एक चांगला व्यायाम ठरू शकतो. यामुळे दात सरळ होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर दातांवरील उपचारासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज भासत नाही.

प्लास्टिक कव्हरचा वापर

ज्या लोकांना दातांवर तार लावणे आवडत नसेल त्यांनी दातांना प्लास्टिक कव्हरचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. यात दातांचा आकार आणि त्याच्या रचनेनुसार प्लास्टिकचे कव्हर करू शकतो. यानुसार दातांना चांगल्या रितीने आवरण दिले जाते. या पद्धतीतून दातांवर चांगला दबाव पडतो आणि परिणामी दात सरळ होण्यास मदत होते.

बोटाने दबाव टाकणे

दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर व्यायाम करतो. त्याचप्रमाणे दातावर बोटाने दबाव टाकण्याची सवय बाळगावी. आपल्या हलक्या हाताने त्यास नियमित रूपाने पाच ते दहा मिनिटांपर्यंत पुढे आलेल्या दाताला दाबत राहा. त्यामुळे बाहेर आलेले दात आतमध्ये जाण्यास मदत मिळते. शेवटी आपल्याला दाताशी संबंधित काही समस्या असेल किंवा लहान मुलांमध्ये दातदुखी असेल तर या टिप्सचा वापर करू शकतो. याशिवाय दंतव्यंगोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करू शकतो. मुलाचे दात बाहेर येत आहेत, असे वाटत असेल तर उपचार लवकर सुरू करावेत. त्यामुळे मुलांना फार काळ या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

डॉ. निखिल देशमुख

Back to top button