

शरीरात कुठेही गळू झाला तर प्रथम संबंधित अवयवाची सूज आणखी वाढवून गहू पिकून, फुटून खूप त्रास होण्याअगोदर उपचार कराये लागतात. हे उपचार शोधन, शामन आणि पुन्हा रोग नये म्हणून कडक पध्याचे, लंघनाचे असतात.
शरीराच्या डोक्यापासून ते तळपायापर्यत कोणत्या अवयवाला कधी गळू होईल, हे अगोदर सांगणे बऱ्याचवेळा अवघड होऊन बसते. काही वेळा एखाद्या व्यक्तीला आपल्या मांडीत आलेली सूज हा केवळ स्थौल्याचा भाग नसून, प्रत्यक्षात गळू, पूर्व सूज आहे हे वैद्य डॉक्टरांनी तपासल्यावरच रुग्णमित्रांच्या लक्षात येते. असे लग अति स्त्री-पुरुष महिना दोन महिन्यात भेटतात.
शरीरातल्या विविध अवयवांना धरून या गळवांची स्थानपरत्वे वेगवेगळी नावे असतात. कर्णशोध डोळ्यातील रांजणवाडी, तोंडातील दात वा हिरड्यातील गळू, तोंडाला उष्णतेचे फोड, घशातील टॉन्सिल ग्रंथीची फाजील वाढ, गळ्याला बाहेरून सूज, गंडमाळ, टीबी ग्लंडचे पू युक्त फोड, सूज, स्तनवृद्धी बाळंतिणीच्या दुधाच्या गाठी, पाठीतील मणक्यावर हाडातील विकारांमुळे गळू, गुद्भागी, भगंदर, मांडीत योनीत, फाजील चरबीमुळे गळू, पोटरीत आणि हाता-पायांच्या बोटांना नखुरडी आणि शरारीत विविध भागांत सोरायसिस विकारामुळे क्वचित होणे असे विविध प्रकार आढळून येतात. शरीरात कुठेही गळू झाला, तर प्रथम संबंधित अवयवाची सूज आणखी वाढवून गळू पिकून, फुटून खूप त्रास होण्याअगोदर उपचार करावे लागतात. हे उपचार शोधन, शामन आणि पुन्हा रोग उद्भवू नये म्हणून कडक लंघनाचे असतात.
संबंधित भागाला पोटीस करणे शक्य असल्यास गळवाच्या आकाराच्या मानाने अर्धा ते एक चमचा टाकणखार चूर्ण कणीक दोन ते चार चमचे एकत्रित पळीमध्ये पिठल्यासारखे पातळ कालवावे. पळीत गरम गरम पोटीस करावे, कागद वा पानावर ठेवून संबधित गळवाची जागा शेकावी- काढावी, शेकावी- काढावी असे फटाफट करावे. त्यानंतर त्या भागाला लावम्याकरिता एलादितेल किंवा शतधौतधृत बाह्योपचारार्थ वापरावे. काही दिवस रुणाने रात्री त्रिफळा चूर्ण नियमितपणे घ्यावे.
आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गूळ, प्रवाळ, कामदुधा प्र.३. गोळ्या दोन वेळेस घेणे. मधुमेह असल्यास मधुमेवाटी, पांडुता असल्यास चंद्रप्रभा, खूप उष्णता असल्यास चंदनदीवटी, मौक्तिकभस्म ही जादा औषधे वापरावी. खूप गंभीर अवस्थेत महातिक्तघृत पोटात घेण्याकरिता तोंडात लावण्याकरिता इरिनेदादीतेल अशी औषधे योजना गरजेनुसार करावी.
शक्य तेवढी विश्रांती, कटाक्षाने खाण्या-पिण्याचे पथ्य पाळणे, मलमूत्रांच्या वेग न आडवणे.
कटाक्षाने बिनमिठाच्या उकडलेल्या भाज्या, गहू, तांदूळ विरहित आहार, ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, सायंकाळी कमी जेवण, कटाक्षाने सर्व प्रकारचा साधा आहार. उकळून जळू विरहीत पाणी, डाळिंब, ताडगोळे, पांढरे खरबूज, अंजीर अशी फळे, काळ्या मनुका पण उत्तम दर्जाच्या कटाक्षाने वापरव्यात.
गहू, भात, वाटाणा, उडीद, हरबरा, मका, मटकी, पोहे, चुरमुरे, विविध मेवा मिठाई, तेलगट तुपकट पदार्थ, मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, रात्री उशिरा जेवण इत्यादी,
आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गूळ, महात्तिकघृत, प्रवाळ, कामदुधा, मौक्तिकभस्म, बाह्योपचारार्थ एलादितेल, शतधौतघृत, इरिमेदादिल.
पचनाकरिता माफक व्यायाम फिरणे. कटाक्षाने अतिरेकी व्यायाम टाळावा.
आवश्यक तेथे तज्ञांच्या देखरेखीखाली टाकणखाराचे पोटोस त्रिफळा काळाने शोधन, एलादितेल वा शतधौत घृताचे रोपण करावे,
युक्तीपूर्वक ब्राह्योपचारार्थ हरिमेदादीतेल, शतधौतघृत, एकलादितेल, जात्यादितेल वापरावे.
रोगाच्या व्याप्तीप्रमाणे एक से दोन दिवस ते जास्तीत जास्त आठ पंधरा दिवस.
कटाक्षाने सात्विक आहार, सायंकाळी सूर्यास्ताअगोदर नेहमीपेक्षा निम्मा आहार
नियमितपणे रात्री त्रिफळा चूर्ण घेणे. गळू पुन्हा उद्भवू म्हणून काहीकाळ वर सांगितलेल्या चार प्रकारच्या गोळ्या आठवणीने घेणे, मधुमेहाला सांभाळून गरज पडल्यास चंद्रप्रभा मधुमेहवटी, रसायनचूर्ण यांचा यथायोग्य वापर करावा.
गळू होणे याचा अर्थ संबंधित रूग्णाचे स्वत: च्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष असते. संबंधित अवयवाला सूज आली आहे हे बहूसंख्य रूग्णांना नकळत असते. पण वळत नाही त्यामुळे 'काट्याचा नायटा' असा प्रकार होतो. वेळीच योग्य उपचार केले तर ते रूग्णहिताचेच असते.
-वैद्य विनायक खडीवाले