जे प्राणी जगण्यासाठी दुसर्या प्राण्यांवर अवलंबून असतात त्यांना ‘परजीवी’ म्हणतात. ते ज्या प्राण्यावर राहतात, त्याच्याकडून संपूर्ण पोषक तत्त्वे काढून घेतात. त्यामुळे बरेचदा तो प्राणी मरतो किंवा अशक्त बनतो.
दुसर्या प्रकारच्या आणखी एका नात्यामध्ये वेगवेगळे प्राणी परस्परांना मदत करतात. बर्याचशा परजीवींची शरीर रचना अतिशय साधी आणि सरळ असते. कारण त्यांना अन्न पचविण्याची गरज नसते. ते दुसर्या प्राण्यांकडून केवळ पोषक घटकच शोषून घेत असतात. अशा परजीवींमध्ये केवळ प्रजनन संस्था असते आणि पचनसंस्था अत्यंत साधी असते.
लिच हा प्राणीसुद्धा परजीवी असून तो रक्त शोषणारा आहे. काही लिच माशांवर जगतात. ते स्वतःचे शरीर माशांच्या शरीराला विशिष्ट प्रकारे चिकटवतात. त्यांच्या तोंडाला शोषण नलिका असते आणि त्याला टोकदार स्पर्शिका असतात. माशांच्या शरीराचा मुलायम भाग असणार्या कल्ल्यांवर किंवा इतर भागावर चिकटून राहतात.