Glass Skin Makeup Tips: आलिया भटसारखा 'ग्लास-स्किन' मेकअप घरी कसा करायचा? पाहा सोप्या टिप्स

आलियासारखा 'ग्लास-स्किन' लूक मिळवण्यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवणे, हलके फाउंडेशन वापरणे आणि हायलाइटरचा योग्य ठिकाणी वापर करणे महत्त्वाचे असते. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट्सच्या टीप्स जाणून घ्या.
Alia Bhatt Makeup Look
Alia Bhatt Makeup LookFile Photo
Published on: 
Updated on: 

Glass Skin Makeup Tips

अभिनेत्री आलिया भट्ट अतिशय कमी मेकअपमध्येही अत्यंत ग्लॅमरस दिसण्याची कला उत्तम जाणते. रेड कार्पेट असो वा चित्रपटाचे प्रमोशन, तिचा 'ग्लास-स्किन' लूक अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. या लूकचे वैशिष्ट्य म्हणजे यात जड फाउंडेशन, गडद कॉन्टूरिंग किंवा अति चकाकी यांचा वापर नसतो. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट्सच्या मते, आलियासारखा उजळ लूक मिळवण्यासाठी त्वचेला हायड्रेट ठेवणे, हलके फाउंडेशन वापरणे आणि हायलाइटरचा योग्य ठिकाणी वापर करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

घरच्या घरी असा लूक मिळवायचा असेल तर...

जर तुम्हाला घरीच असा लूक मिळवायचा असेल, तर त्यासाठी खूप मोठ्या मेकअप किटची गरज नाही. काही निवडक उत्पादनांच्या मदतीने तुम्ही असा ताजातवाना लूक मिळवू शकता.

हायलायटिंग प्राइमर: मेकअपची सुरुवात 'स्विस ब्युटी' सारख्या हायलायटिंग प्राइमरने करता येते. फाउंडेशन किंवा स्किन टिंटखाली याचा पातळ थर लावल्यास, विशेषतः गालांवर आणि उजळपणा हवा असलेल्या भागांवर नैसर्गिक चमक येते. केवळ हायलाइटरवर अवलंबून न राहता मेकअपसाठी एक उजळ बेस तयार करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

Alia Bhatt Makeup Look
Most Beautiful Women in the World: जगातील सर्वात सुंदर महिला कोणत्या देशात आहेत? पाहा क्रमवारी

स्किन टिंट: 'ग्लास-स्किन' लूकमध्ये जड फाउंडेशनमुळे नैसर्गिकपणा कमी होऊ शकतो. त्याऐवजी 'एफएई ब्युटी' सारख्या सीरम स्किन टिंटचा पर्याय वापरता येतो. त्वचेच्या रंगाशी मिळताजुळता शेड निवडून बोटांनी किंवा ओलसर स्पंजने तो एकसारखा पसरवल्यास त्वचेला हलका आणि तजेलदार पोत मिळतो.

फेस ब्लशर: गालांवर हलकी गुलाबी-पीच छटा दिल्यास लूक अधिक तरुण आणि ताजेतवाना दिसतो. 'मार्स फ्लश ऑफ लव्ह' सारखा ब्लशर गालांच्या मध्यभागापासून गालाच्या हाडांकडे हलक्या हाताने पसरवता येतो. यामुळे मेकअप अधिक भडक न वाटता चेहऱ्याला एक उठाव मिळतो.

लिक्विड हायलाइटर: चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी 'जस्ट हर्ब्स' च्या लिक्विड हायलाइटरचा विचार करता येतो. गालांचा उंच भाग, नाक आणि ओठांच्या वरील भागावर अत्यंत थोड्या प्रमाणात ते लावावे. ठळक ग्लिटरऐवजी प्रकाशात उठून दिसणारी सौम्य चमक मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.

ग्लॉसी लिप कलर: मेकअप पूर्ण करण्यासाठी ओठांवर हलका गुलाबी, रोझी न्यूड किंवा न्यूट्रल ग्लॉस वापरता येतो. 'रेव्हलॉन सुपर लस्टरस द ग्लॉस' सारखा पर्याय थेट किंवा न्यूड-पिंक लिप लाइनरसोबत लावल्यास गालांच्या पीच-पिंक रंगाशी तो छान जुळून येतो आणि लूक पूर्ण करतो.

नैसर्गिक 'ग्लास-स्किन' फिनिशसाठी महत्त्वाच्या टिप्स

पावडरचा अतिरेक टाळा: जास्त सेटिंग पावडर लावल्यास त्वचेची चमक कमी होऊ शकते. गरज भासल्यास केवळ नाकाभोवती, कपाळावर आणि डोळ्यांखाली थोडी पावडर लावावी.

क्रीम आणि लिक्विड उत्पादनांना प्राधान्य: त्वचेचा ताजेपणा आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी क्रीम तसेच लिक्विड पोताची उत्पादने अधिक उपयुक्त ठरतात.

हायलायटरचा मर्यादित वापर: 'ग्लास-स्किन' म्हणजे ठळक ग्लिटर नसून निरोगी चमक होय; त्यामुळे हायलाइटर बेताचेच वापरावे.

त्वचेच्या प्रकारानुसार बदल: तेलकट त्वचा असल्यास चमक केवळ गालांच्या हाडांपुरती मर्यादित ठेवावी, तर कोरड्या त्वचेसाठी मेकअपपूर्वी मॉइश्चरायझिंगवर अधिक भर द्यावा.

सनस्क्रीन विसरू नका: मेकअप हा सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षणाचा पर्याय ठरत नाही; त्यामुळे सनस्क्रीनचा वापर आवश्यक आहे.

Alia Bhatt Makeup Look
Beauty Tips: तुमचे पाय स्वच्छ आणि सुंदर बनवायचे आहेत का? या ३ गोष्टी एकत्र मिसळा आणि लावा
Alia Bhatt Makeup Look
Pakistani women beauty treatment: पाकिस्तानी मुली अधिक सुंदर दिसण्यासाठी तुर्कीला का जात आहेत? जाणून घ्या तिथे असे काय आहे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.