गुरू ग्रह आजपासून रोहिणी नक्षत्रात; धनलाभ आणि शुभफल प्राप्तीसाठी काय उपाय कराल?

गुरू ग्रह आजपासून रोहिणी नक्षत्रात; धनलाभ आणि शुभफल प्राप्तीसाठी काय उपाय कराल?

[author title="चिराग दारूवाला" image="http://"][/author]

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

गुरू हा सर्व ग्रहांतील सर्वांत शुभ मानला जातो. त्यामुळे गुरूने रास बदलल्यानेच नाही तर नक्षत्र बदलल्यानेही त्याचे परिणाम सर्व बाबतीत पाहायला मिळतात. गुरू ग्रहाने १३ जूनला सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी कृतिका नक्षत्रातून रोहणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. रोहणी नक्षत्राचा राजा चंद्र तर देवता ब्रह्म आहे. गुरू ग्रहाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्याने व्यापार, करिअर, प्रेम, आरोग्य यावर कसा प्रभाव पडले हे आपण जाणून घेऊ.

गुरू ग्रहाच्या गोचरचे परिणाम

ज्योतिष शास्त्रानुसार गुरू ग्रहाचा रोहिनी नक्षात्रातील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो. रोहिणी नक्षत्र हे चंद्राचे आहे, आणि त्यात देवगुरू गुरू ग्रह प्रवेश करत आहे. या गोचरमुळे गुरू ग्रह संपत्ती, सधनता आणि भाग्य यात वृद्धी देतो. योग्य आणि शुभ कर्मातून या काळात पैशाची आवक कैक पटीने वाढू शकते. संपत्तीबरोबरच हे गोचर मुले, सामाजिक प्रतिष्ठा, आध्यात्म आणि धार्मिकबाबतीत शुभ मानले जाते.

व्यवसायावर परिणाम

गुरू ग्रहाच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशामुळे व्यवसायात चौफेर प्रगती होईल. तुम्हाला कर्मचाऱ्यांचे पुरेपूर सहकार्य मिळेल आणि नफा मोठ्या प्रमाणावर वाढेल. कर्जाचा बोझा कमी होईल. व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळतील.

करिअरवर परिणाम

गुरू ग्रहाचे रोहिणी नक्षत्रातील गोचर करिअरमध्येही फायद्याचे ठरेल. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढेल आणि व्यक्तिमत्त्व सुधारेल. अध्यासात मन लागेल. वरिष्ठ आणि शिक्षकांची मदत मिळेल. शिक्षणाशी संबंधित संस्थांना आर्थिक लाभ होईल.

प्रकृतीवर परिणाम

रोहिणी नक्षत्राचा प्रभाव छातील, फफ्फुस आणि हृदयावर असतो. तणाव नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यामुळे प्रकृती चांगली राहील. या गोचर काळात सर्दी, फ्लू असे श्वसनसंस्थेचे आजार, रक्तभिसरण संस्थेशी संबंधित आजार आणि मानसिक विकार डोके वर काढू शकतात. त्यामुळे योगासने, ध्यानधारणा यांचा समावेश दैनंदिन जीवनात करावा, असा सल्ला आहे. जीवनाबद्दल सकारत्मक दृष्टिकोन स्वीकारणे, मित्र आणि कुटुंबीयांची मदत घेत आनंदी जीवन अंगीकारणे यातून मानसिक ताण कमी करता येऊ शकतो.

प्रेमजीवनावर परिणाम

गुरू ग्रहाच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशामुळे प्रेमजीवन आणि नातेसंबंधात संतुलन आणि स्थिरता येते. एकमेकांबद्दल आदर वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदारासोबतच्या नातेसंबंधात गोडवा राहील. जे लोक एकटे आहेत, त्यांना चांगले प्रस्ताव येतील. रोहिणी नक्षत्र प्रेम, सद्भावना, समजूतदारपणा यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे तुमचे मैत्रीचे संबंधही चांगले राहतील. जुने मैत्रीचे संबंध टिकवून, नवे नातेसंबंध प्रस्थापित होतील. जे लोक तुम्हाला प्रेरणा देतील, पाठबळ देतील अशांच्या सानिध्यात राहा.

उपाय

रोहिणी नक्षत्राशी ताळमेळ ठेवण्यासाठी राहात्या जागी तसचे कपडे, वापरातील वस्तूंत पिवळा आणि क्रिम कलरचा समाविष्ट करा. वास्तूत सुधारणा करणे आणि घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे योग्य ठरते. घरी ईशान्य दिशेला झाडे ठेवणे, उत्तर दिशेकडील अडगळ दूर करणे फायद्याचे ठरते आणि त्यामुळे घरी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.  भगवान विष्णूची पूजा करणे, गायत्री मंत्राचे पठण करणे लाभकारक ठरते, त्यामुळे तुम्ही आध्यात्माशी जोडले जाल, सकारात्मक ऊर्जा वाढेल.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news