‘एनडीए’ सरकारच्या तिसऱ्या कार्यकालासाठी शेअर बाजार सज्ज

‘एनडीए’ सरकारच्या तिसऱ्या कार्यकालासाठी शेअर बाजार सज्ज

[author title="भरत साळोखे, ( संचालक, अक्षय प्रॉफिट अॅड वेल्थ प्रा. लि.)" image="http://"][/author]

शनिबार, दिनांक १ जून रोजी संपले आणि त्याच दिवशी संध्याकाळी विविध वाहिन्यांवरून एक्झिट पोल्सचे आकडे प्रसारित झाले. झाडून साऱ्या वाहिन्यांनी एक्झिट पोल्सचे ३८० च्या वर जागा मिळणार असल्याचे भाकीत केले आणि ३ जून रोजी म्हणजे सोमवारी निफ्टीने ८०० पॉईंटस्ची रॅली दाखवली. रॅली दाखवली इतकी की, २३३३८.७० हा आतापर्यंतचा सार्वकालिक उच्चांकही नोंदवला. सेन्सेक्स २५०० पॉईंटस्नी, तर बैंक निपरी २००० पॉईंटस्नी उसळला. परंतु मंगळवारी प्रत्यक्ष निकाल जाहीर झाले आणि एक्झिट पोल्सच्या आकड्यांचा धुव्वा उडाला. भाजपला स्वबळावर बहुमत गाठता न आल्यामुळे बाजारात जी दाणादाण उडाली ती खालीलप्रमाणे.

निफ्टी १३७९ पॉईंटस्ची पसरण बैंक निफ्टी ४०५२ पॉईंटस्ची पसरण सेन्सेक्स ५४४४ पॉईंटस्ची घसरण. पुढील तीनही दिवस बाजार सावरल्यामुळे निफ्टी २३२९०, सेन्सेक्स ७६६९३ आणि बैंक निफ्टी ४९८०३ वर बंद झाले. रिअँल्टी, आयटी, एफएमसीजी आणि ऑटो शेअर्स या आठवड्यात चांगले वधारले. रिॉल्टी इन्डेक्समधील सर्व शेअर्स पाच टक्क्यांहून अधिक वाढले. प्रेस्टीज इस्टेटस् (CMP – रु. १७६१) हा शेअर साडेचौदा टक्के वाढला. शुक्रवारी त्याने १८२२ हा वर्षभरातील उच्चांकही नोंदवला. एका वर्षत हा शेअर जवळजवळ चौपट झाला आहे.

आयटी इंडेक्समधील सर्व शेअर्सनीहो चांगली तेजी दाखवली. इन्फोसिस एम्फेंसिस, टीसीएस, एचसीएल टेक, एलटीआय माईंड ट्री, एलटीटीएस, कोकोर्ज, पर्सिस्टंट हे सर्व शेअर्स ४ ते ९ टक्के वाढले. विप्रो आणि टेक महिंद्र हे शेअर्स अकरा टक्क्यांनी वाडले.
यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मान्सूनचे मान्सूनचे प्रमाण चांगले राहिले तर Rural Consumption वाढते. शिवाय नवीन सरकारकडूनही ग्रामीण योजनांना बूस्टर मिळण्याची आशा आहे, त्यामुळे कित्येक महिने रखडणारे FMCG sector ने तेजीचे संकेत दर्शवले आहेत. कोलगेट पामोलिव्ह, ब्रिटानिया, डाबर, युनायटेड -स्पिरीटस्, मंरिको आणि गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस् या शेअर्सनी ५२ Week High चा उच्चांक सप्ताहात नोंदवला.

जी परिस्थिती FMCG ची, तीच ऑटो सेक्टरची! वाहनांना मागणी हा Rural Consumption चाच भाग असतो. महिंद्र अँड महिंद्र, अशोक लेलैंड, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, भारत फोर्ज, एक्साईड इंडस्ट्रीज, हिरो मोटो आणि संवर्धन मदरसन या शेअर्सनी ५२ Week High चे आकडे सप्ताहात दाखवले. या सप्ताहात एका शेअरने धुमाकूळ घातला आणि तो शेअर आहे.

Heritage Foods! रु. ६६१.२५ वर सप्ताहाच्या अखेरीस बंद झालेल्या या शेअरने सप्ताहात ५६ टक्के रिटर्नस् दिले. मागील एका महिन्यात ८३ टक्के, तर एका वर्षात २०० टक्क्यांहून अधिक रिटर्नस् दिले आहेत. १९९२ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी डेअरी, अॅग्री आणि सरासरी, सेल्स ग्रोथ ९ टक्के, प्रॉफीट, ग्रोथ ५ टक्के आणि रिटर्न ऑनइविवटी ८ टक्के आहे. आर्थिक कामगिरी इतकी सर्वसाधारण असताना, या शेअरने एका वर्षात इतका छप्परफाड परतावा कसा काय दिला? तर भुवनेश्वरी नारा (चंद्राबाबू नायडूंच्या पत्नी) त्यांच्याकडे या कंपनीचे २५ टक्के शेअर्स आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरचे पहिले पतधोरण रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केले. सलग आठव्या बैठकीमध्ये बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवला. (६.५ टक्के) आर्थिक वर्ष २०२५ साठी GDP वाढीचा अंदाजही पूर्वीच्या ७ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांपर्यंत वाढवला.

दिनांक ३ जूनच्या Business Today च्या पोर्टलवर अकरा शेअर्सची एक यादी प्रसिद्ध झाली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे ३० मे २०१९ ते ३१ मे २०२४ या पाच वर्षांच्या काळात या शेअर्सनी केलेली कमाल खालील चौकटीत पाहा.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news