जाणून घ्या ब्रेन ट्यूमर | पुढारी

जाणून घ्या ब्रेन ट्यूमर

डॉ. ज्योती मेहता

ट्यूमर मेंदूच्या विविध पेशींमध्ये असतात ज्यामुळे डोकेदुखी, झटके येणे, शारीरिक संतुलन गमावणे, द़ृष्टिदोष आणि ऐकू येण्याच्या क्षमतेत बदल, स्मृतीसंबंधी समस्या, शरीराच्या एका भागात किंवा एका बाजूला अशक्तपणा किंवा अर्धांगवायू, चक्कर येणे, बोलताना अडखळणे, चेहर्‍याचा सुन्नपणा अशी ब्रेन ट्यूमरचे विविध लक्षणे दिसून येतात.

ब्रेन ट्यूमरचा एक सामान्य प्रकार म्हणजे मेनिन्जिओमा, जो मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या सभोवतालच्या संरक्षणात्मक स्तर असलेल्या मेनिन्जेसपासून उद्भवतो. मेनिन्जिओमा सामान्यत: हळू वाढणारे आणि सहसा सौम्य असतात.

ट्यूमरचा आणखी एक प्रकार म्हणजे ग्लिओमा, जो मेंदूतील चेतापेशींना आधार देणार्‍या ग्लिअल पेशींमुळे उद्भवतो. ग्लिओमाचे वर्गीकरण उपप्रकार जसे की, स्ट्रोसाईटोमा, ऑलिगोडेंड्रोग्लिओमास आणि एपेन्डीमोमासमध्ये केले जाऊ शकते.
ब्रेन ट्यूमरमागील नेमके कारण अनेकदा अज्ञात आहे. किरणोत्सर्गाच्या संपर्कात येणे किंवा काही आनुवांशिक परिस्थिती यासारखे घटक विकसित होण्याची शक्यता वाढवतात.

ब्रेन ट्यूमरचे निदान एमआरआय, सीटी स्कॅन आणि बायोप्सीद्वारे केले जाऊ शकते. ट्यूमरचे स्थान, वय, ट्यूमरचा प्रकार आणि आकार यावर आधारित उपचार केले जातात.

उपचार

ट्यूमर काढून टाकण्यासाठी आणि मेंदूला होणारे नुकसान कमी करण्यासाठी मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या (क्रॅनिओटॉमी) स्वरूपात उपचार केले जातील. शंटस्, रेडिएशन थेरपी, इम्युनोथेरपी, केमोथेरपी, रेडिओसर्जरी आणि टार्गेटेड थेरपीदेखील ब्रेन ट्यूमर असलेल्यांसाठी वरदान ठरू शकते.

हेही वाचा 

 

Back to top button