WhatsApp Chat Filter Feature : व्हॉट्सॲपचा नवा चॅट फिल्टर लॉन्च; आता एकही मेसेज चुकणार नाही!

WhatsApp Chat Filter Feature : व्हॉट्सॲपचा नवा चॅट फिल्टर लॉन्च; आता एकही मेसेज चुकणार नाही!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सॲपवर तुम्हाला दररोज खूप मेसेज येत असतील तर यातील अनेक मेसेज चुकतात. कधी-कधी तुम्ही व्यस्त असता, त्यामुळे त्यावेळी तुम्ही कोणत्याही व्हॉट्सॲप मेसेजला रिप्लाय दिला नाही, तर ते मेसेज चुकतात. हे टाळण्यासाठी व्हॉट्सॲपने नवीन चॅट फिल्टर फीचर लाँच केले आहे. (WhatsApp Chat Filter Feature)

व्हॉट्सॲप आपल्या प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन फिचर्स आणत आहे. कंपनीने अलीकडेच Android वापरकर्त्यांसाठी UI पुन्हा डिझाइन केले आहे. तसेच व्हॉट्सॲपवर नवीन सर्च बार आणि मेटा एआय फीचरही आले आहे. मात्र Meta AI चे वैशिष्ट्य अद्याप सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. आता व्हॉट्सॲपने आपल्या प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन फीचर जोडले आहे. हे फीचर चॅट फिल्टरचे आहे. Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने या फीचरची माहिती देणारी एक ब्लॉग पोस्ट जारी केली आहे. हे फीचर तुमच्या चॅट्सला All, Unread आणि Groups अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागते.

WhatsApp चॅट फिल्टर म्हणजे काय?

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी चॅट फिल्टर फीचर लाँच झाल्याची माहिती दिली आहे. या फीचरनंतर तुम्ही सर्व मेसेज सहज फिल्टर करू शकाल. या फीचरमुळे चॅट ओपन करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. कंपनी तुम्हाला वेगवेगळ्या चॅट्स फिल्टर करण्याचा पर्याय देत आहे. हे फीचर आणण्यामागचे कारण म्हणजे लोकांना वेगवेगळ्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये प्रवेश करणे सोपे व्हावे. आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही व्हॉट्सॲप ग्रुपमधील चॅट्स स्क्रोल करून न वाचलेल्या मेसेजसाठी इनबॉक्समध्ये जावे लागत होते. आता तुम्हाला यासाठी फिल्टर्स मिळतील, ज्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी ग्रुप चॅट पाहू शकाल.

WhatsApp Chat Filter Feature कसे वापरायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल. तुम्ही अँड्रॉइड यूजर्स असाल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून ॲप अपडेट करावे लागेल. तुम्ही iOS वापरकर्ते असल्यास, ॲपल ॲप स्टोअरवरून अपडेट करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला चॅट ऑप्शनवर जावे लागेल. जिथे शीर्षस्थानी तुम्हाला All, Unread, Group असे तीन पर्याय मिळतील.
  • जर तुम्ही कोणताही संदेश किंवा चॅट वाचले नसेल तर ते न वाचलेल्या श्रेणीत जाईल.
  • याशिवाय ग्रुप मेसेज स्वतंत्रपणे पाहता येतात.
  • अशा प्रकारे वापरकर्त्यांचा एकही संदेश चुकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news